मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पेट्रोल डिझेल सारख्या इंधनाच्या किमती गेल्या चार-पाच वर्षात प्रचंड प्रमाणात वाढल्याने वाहनचालकांना मोठा आर्थिक भुर्दंड बसत आहे. सहाजिकच अनेक जण इलेक्ट्रिक वाहनांकडे आकर्षित होत आहेत. गेल्या दोन वर्षापासून देशात इलेक्ट्रिक दुचाकींची मागणी झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे इलेक्ट्रिक वाहन निर्मात्याला त्याच्या उत्पादनाचा वेग वाढवायचा आहे. याद्वारेच मागणी आणि पुरवठ्याचे गणित सुरळीत होणार आहे. याच माध्यमातून आज हिरो इलेक्ट्रिकने महिंद्रा अँड महिंद्रा सोबत करार केला आहे. त्यानुसार आता हिरो इलेक्ट्रिकच्या दुचाकी मध्य प्रदेशातील पिथमपूर येथे असलेल्या महिंद्राच्या कारखान्यात तयार होतील.
हिरो इलेक्ट्रिक कंपनीच्या म्हणण्यानुसार, हिरो ऑप्टीमा आणि NYX सध्या महिंद्राच्या कारखान्यात तयार केले जातील. या करारामुळे आणि हिरो इलेक्ट्रिकच्या लुधियाना येथील कारखान्याच्या विस्तारामुळे, कंपनी यंदा म्हणजे मार्च 2022 पासून दरवर्षी 10 लाख इलेक्ट्रिक दुचाकींचे उत्पादन सुरू करेल, असे हिरो इलेक्ट्रिकने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
या संदर्भात हिरो इलेक्ट्रिकचे सीईओ नवीन मुंजाल म्हणाले, या भागीदारीत दोन्ही कंपन्या इलेक्ट्रिक वाहनांच्याबद्दल एकमेकांच्या सखोल ज्ञानाचा फायदा घेतील आणि पुढील काही वर्षांमध्ये नवीन उत्पादने तयार करतील. तर ऑटो अँड फार्म्सचे राजेश जेजुरीकर म्हणाले की, या धोरणात्मक भागीदारीचा फायदा होईल. दोन्ही व्यवसायांच्या एकत्रित ताकदीतून. काही दिवसांपूर्वी सरकारने इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंगबाबत मोठा बदल केला होता. त्यानंतर आता ई-वाहन मालक त्यांच्या इलेक्ट्रिक कार किंवा दुचाकी घर किंवा ऑफिसमध्ये चार्ज करू शकतील. यासाठी सरकारने इन्फ्रास्ट्रक्चर तयार करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे बदलली आहेत. या अंतर्गत सध्याच्या वीज कनेक्शनवरूनच वाहन चार्ज करता येईल.
ईव्ही चार्जिंग स्टेशनशी संबंधित महत्त्वाच्या बाबी अशाः
सार्वजनिक चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी सरकारी जमिनीचा वापर केला जाईल. रेव्हेन्यू शेअरिंगच्या आधारावर 1/kWh दर निश्चित केला आहे. जमीन मालकीच्या एजन्सीला त्रैमासिक आधारावर पेमेंट केले जाईल. करार 10 वर्षांच्या कालावधीसाठी असेल. अर्जावर लवकरच वीज जोडणी दिली जाईल. मेट्रो शहरांमध्ये पीसीएसला 7 दिवसांत वीज जोडणी. अन्य महापालिका क्षेत्रात 15 दिवसांत वीज जोडणी. ग्रामीण भागात 30 दिवसांत कनेक्शन. सार्वजनिक स्टेशनला वीज पुरवठ्यासाठी सिंगल पार्ट टेरिफ असेल. 31 मार्च 2025 पर्यंत वीज पुरवठ्याची सरासरी किंमत ओलांडणार नाही.