सिद्धी दाभाडे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
घराघरात प्रेक्षकांचे मन जिंकणारी टिव्ही मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही लवकरच ४ हजार भाग पूर्ण करणार आहे. दीर्घकाळापासून टीआरपी चार्टमध्ये हा शो उच्चस्थानी आहे. या शोची कथा आणि कलाकार प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. आता या शोमध्ये आणखी एका चेहऱ्याची एन्ट्री झाल्याचे वृत्त आहे. विशेष म्हणजे, ही एक बोल्ड अभिनेत्री आहे. त्यामुळेच ती सोशल मीडियावर चांगलीच चर्चा आहे.
‘तारक मेहता’मधील बबिता आणि अंजली यांचा बोल्डनेस सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे. त्यात आता या शोमध्ये एका नव्या अभिनेत्रीचा प्रवेश झाला आहे. ती अभिनेत्री म्हणजे अर्शी भारती. तारक मेहता यांच्या बॉसची सेक्रेटरी म्हणून अर्शीने शोमध्ये प्रवेश केला आहे. अर्शी भारती गेल्या काही एपिसोडमध्ये दिसली आहे.
अर्शी भारती मीडियाची विद्यार्थिनी होती. पण तिची अभिनयाची आवड वाढत गेली. पत्रकार बरखा दत्ता यांना भेटल्यानंतर तिला आणखी प्रोत्साहन मिळाले, असे अर्शीने एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितले आहे. फेमस पीपल इंडिया वर्ल्डच्या मते, अर्शी भारती ही अभिनव भानूच्या पेपरबॅकची ब्रँड अॅम्बेसेडर आहे. ज्यांच्यासोबत ती तीन चित्रपट करत आहे. अभिनेता रवी किशनसोबत ती एका चित्रपटात दिसणार आहे.
२२ वर्षीय अर्शी मूळची जमशेदपूरची आहे. अर्शीचे पूर्ण नाव अर्शी भारती शांडिल्य असे आहे. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या शोपूर्वी तिने पानिपत चित्रपटातही भूमिका केली आहे. या चित्रपटात अर्जुन कपूर, संजय दत्त आणि क्रिती सेनॉन हे मुख्य भूमिकेत होते.