सिद्धी दाभाडे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
कोरोनामुळे सर्वच क्षेत्रांवर विपरीत परिणाम झाला आहे. अनेक व्यवसाय ठप्प झाले आहेत. सर्वसामान्यांपासून सर्वांनानाच त्याची झळ पोहचते आहे. काहींची नोकरी गेली, काहींचा रोजगार अर्ध्यावर आला आहे तर काही आणखी संकटात ढकलले गेले आहेत. या दुष्टचक्रातून बॉलिवूड स्टारही सुटलेले नाहीत. हो, खुद्द बीग बी अमिताभ बच्चन यांनाही कोरोनाने चांगलाच फटका दिला आहे. खुद्द बीग बीनेच त्याची माहिती दिली आहे.
अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे. या छायाचित्रात अमिताभ बच्चन यांनी त्यांचा चेहरा झूम करून दाखवला आहे. ज्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरील सुरकुत्या स्पष्टपणे दिसत आहेत. त्याशिवाय अमिताभ यांचे डोळ्यातले तेज आणि त्यांचे स्मित हास्य सुद्धा बघायला मिळत आहे.
अमिताभ बच्चन यांचे सध्या काम ठप्प झाले आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना ही माहिती त्यांनी दिली आहे. अमिताभ बच्चन यांनी सोशल मिडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये त्यांनी स्पष्ट केले आहे की, त्यांचे काम थांबले आहे. अमिताभ या पोस्टमध्ये म्हणतात की, काम वाम सब बंद है. बस दाढी बढते जा रही है.’ अमिताभ बच्चन यांची ही पोस्ट चाहत्यांमध्ये चांगलीच व्हायरल होत आहे.
अवघ्या काही तासांतच त्यांच्या या पोस्टला लाखो लाईक्स मिळाले आहेत. हा आकडा सातत्याने वाढत आहे. या फोटोवर अभिनेत्री बिपाशा बसूने सुद्धा ‘सो क्युट’ अशी कमेंट केली आहे.अमिताभ बच्चन यांच्या कार्याबद्दल सांगायचे झाले तर ते सध्या अनेक मोठ्या चित्रपटांमध्ये ते दिसणार आहेत. त्यांच्या आगामी चित्रपटांमध्ये ‘ब्रम्हास्त्र’, ‘झुंड’, ‘रन वे’, ‘द इंटर्न’ आणि ‘गुड बॉय’ यांचा समावेश आहे. मात्र, कोरोनामुळे या सर्व चित्रपटांचे शुटींग ठप्प झाले आहे.