India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

गुजरातमध्ये कांदा उत्पादकांना मदत, महाराष्ट्रात का नाही? छगन भुजबळांचा शिंदे-फडणवीसांना सवाल

India Darpan by India Darpan
March 8, 2023
in महत्त्वाच्या बातम्या
0

 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यात अवकाळी पावसाने प्रचंड नुकसान झाले असून एकीकडे होळी साजरी होत असतांना शेतकऱ्यांच्या पिकांची होळी झाली. तर धुळवडीचे रंग खेळले जात असतांना शेतकऱ्यांचे जीवनच बेरंग झालं. त्यामुळे अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना तातडीने मदत घोषित करण्याची गरज आहे. गुजरात सारख्या राज्याने कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आल्यावर ३५० कोटी रुपयांची मदत घोषित केली. महाराष्ट्रात तर सर्वाधिक कांदा उप्तादक शेतकरी असतांना अद्याप महाराष्ट्र सरकारकडून शेतकऱ्यांना मदत का नाही असा सवाल राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी आज सभागृहात स्थगन प्रस्तावाद्वारे उपस्थित केला.

छगन भुजबळ म्हणाले की, अवकाळी पावसामुळे प्रचंड असे नुकसान झाले असून काही ठिकाणी द्राक्षाच्या बागा जमीनदोस्त झाल्या आहेत. शेतकऱ्यांना पुन्हा नव्याने या बागा उभ्या करावे लागणार आहे. त्यामुळे हे द्राक्ष शेतकरी आता पाच वर्ष मागे गेला आहे. कांदा, गहू, हरबरा, आंबा, भाजीपाला यासह अनेक शेती पिकाचे मोठ नुकसान झालं आहे. अवकाळी पावसाने प्रचंड नुकसान झाल्याने शेतकरी अक्षरशा आपलं तोंड बडवून घेत आहे. आज महिला दिन साजरा होत असताना माय माऊली देखील आपण तोंड बडवून घेत रडताय ही अतिशय गंभीर बाब आहे.

कांदा उत्पादक शेतकरी अडचणी आला असून अद्यापही शेतकऱ्यांना दिलासा मिळत नाही. याबाबत आपण सभागृहात भूमिका मांडली. अद्यापही नाफेड प्रत्यक्ष मार्केटमध्ये कांदा खरेदी न करता बाहेरच कांदा खरेदी करत आहे. परिस्थिती इतकी गंभीर झाली आहे की, नाशिक जिल्ह्यात तर शेतकऱ्यांनी कांद्याला भाव न मिळत असल्याने चक्क गाव विकायला काढले आहे. ही बाब अतिशय चिंताजनक आहे. गुजरात सारखे छोट राज्य कांदा उत्पादक शेतकऱ्यांना ३५० कोटी रुपयांची मदत करतंय. आपल्या राज्यातील शेतकरी अवकाळी व शेतमालाला भाव मिळत नसल्याने अडचणीत आला आहे. ही परिस्थिती आता हाताबाहेर चालली असून शासनाने तातडीने कारवाई करत मदतीची घोषणा करावी. सभागृहात यावर चर्चा करून आजच्या आज निर्णय घ्यावा अशी मागणी छगन भुजबळ यांनी बोलतांना केली. या दरम्यान शासनाकडे मदतीसाठी प्रस्ताव पाठविण्यात आले आहे. तात्काळ मदत करण्यात येऊन आजच सभागृहात सविस्तर निवेदन करण्यात येईल अशी माहिती उत्तरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिली.

Chhagan Bhujbal on Inion Farmers Help Issue


Previous Post

अखेर पवारांनी ठरवलं! नागालँडमध्ये भाजपसोबत जायचं की नाही? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Next Post

नौदलाच्या हेलिकॉप्टरचे अरबी समुद्रात इमर्जन्सी लँडिंग; ३ जणांना वाचविण्यात यश

Next Post

नौदलाच्या हेलिकॉप्टरचे अरबी समुद्रात इमर्जन्सी लँडिंग; ३ जणांना वाचविण्यात यश

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

आज या व्यक्तींनी कुठलाही व्यवहार करु नये; जाणून घ्या, मंगळवार, २१ मार्च २०२३चे राशिभविष्य

March 20, 2023

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – मंगळवार – २१ मार्च २०२३

March 20, 2023

इंडिया दर्पण – हास्य षटकार – युवक आणि युवती

March 20, 2023

ओले खोबरे खावे की सुके? नारळाच्या पाण्याचे आहेत एवढे सारे फायदे; आहारात नक्की समावेश करा

March 20, 2023

शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे; गारपिट नुकसानीचे पंचनामे येत्या दोन दिवसांत अंतिम करणार – मुख्यमंत्री

March 20, 2023
संग्रहित फोटो

अॅड. गुणरत्न सदावर्तेंच्या ठाण्यातील कार्यालयात चोरी; हे सर्व सामान लंपास

March 20, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group