India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

अखेर पवारांनी ठरवलं! नागालँडमध्ये भाजपसोबत जायचं की नाही? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

India Darpan by India Darpan
March 8, 2023
in Short News
0

 

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – संपूर्ण देशात भारतीय जनता पक्षाच्या विरोधी वातावरण तयार होणे आवश्यक आहे. यासाठी सर्व विरोधकांनी एकत्र यायला हवे, असे आवाहन वेळोवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे. महाराष्ट्रातही भाजपला दूर ठेवण्यासाठीच काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांची महाविकास आघाडी स्थापण्यात आली. आणि आता नागालँडमध्ये शरद पवारांनी मोठा निर्णय घेतला आहे. नागालँडमध्ये सत्तास्थापनेसाठी राष्ट्रवादी ही भाजपसोबत जाणार आहे.

नागालँडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला ७ जागा मिळाल्या आहेत. एनडीपीला २५, भाजपला १२ जागा जिंकल्या आहेत. सत्तास्थापनेसाठी एनडीपी आणि भाजपकडे बहुमत आहे. असे असतानाही राष्ट्रवादीने भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता याठिकाणी विरोध पक्षच राहणार नसल्याचे स्पष्ट होत आहे. नागालँडच्या निवडणुकीत एनपीपीने ५, नगा पिपल्स फ्रंट २, लोकशक्ती जनता पार्टी (रामविलास पासवान) २ आणि रिपाइ (आठवले) यांनी २ जागा जिंकल्या आहेत. जनता दल युनायटेडने १ आणि ४ अपक्ष निवडून आले आहेत.

भाजपसोबत जाण्याची खेळी नेमकी काय आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. देशभरात भाजपविरोधी पक्ष एकत्र येत आहेत. तपास यंत्रणांचा गैरवापर होत असल्याचे कारण देत पवारांसह देशातील ९ विरोधी पक्षांनी त्यांच्या स्वाक्षरीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. २०२४च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपविरोधी आघाडी तयार होत असल्याचे दिसत असतानाच आता पवारांनी नागालँडमध्ये भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढविले जात आहेत.

नागालँडमध्ये राष्ट्रवादी अखेर भाजपसोबतच

भाजप एनडीपीपी आघाडीला सत्ता स्थापनेसाठी कुठलीही गरज नसताना राष्ट्रवादी विरोधात बसायला तयार नाही

नागालँडमध्ये विनाविरोधक असं सर्वपक्षीय सरकार बनणार

नागालँड राज्याच्या हिताचा विचार, मुख्यमंत्री रिओ यांच्याशी संबंधांचे कारण आहे यावेळी 😄

— Prashant Kadam (@_prashantkadam) March 8, 2023

NCP Sharad Pawar Decision Nagaland BJP Alliance


Previous Post

तेलंगाणाचे मुख्यमंत्री राव यांच्या कन्येला ईडीचे समन्स; चौकशीला हजर राहण्याचे आदेश

Next Post

गुजरातमध्ये कांदा उत्पादकांना मदत, महाराष्ट्रात का नाही? छगन भुजबळांचा शिंदे-फडणवीसांना सवाल

Next Post

गुजरातमध्ये कांदा उत्पादकांना मदत, महाराष्ट्रात का नाही? छगन भुजबळांचा शिंदे-फडणवीसांना सवाल

ताज्या बातम्या

या व्यक्तींवर आज लक्ष्मी प्रसन्न राहील; जाणून घ्या, रविवार, २ एप्रिल २०२३चे राशिभविष्य

April 1, 2023

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – रविवार – २ एप्रिल २०२३

April 1, 2023

इंडिया दर्पण – हास्य षटकार – पतीचा मोबाईल

April 1, 2023

नाशिकचे रामकुंड आणि गोपिकाबाई यांचा काय संबंध आहे…. असा आहे इतिहास…..

April 1, 2023

हा एक निर्णय घ्या… कांद्याचा प्रश्नच मिटून जाईल… कांदा उत्पादक संघटनेने दिला हा मोठा पर्याय

April 1, 2023

कोरोना अपडेट : देशात गेल्या २४ तासात इतक्या नव्या कोरोना रुग्णांची नोंद

April 1, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group