India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

भाजपाचे नेते मोहित कंबोज यांना आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी क्लीनचिट; विधिमंडळात पडसाद उमटण्याची शक्यता

India Darpan by India Darpan
December 23, 2022
in संमिश्र वार्ता
0

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) –  भारतीय जनता पक्षाचे नेते मोहित कंबोज यांना दोन प्रकरणांमध्ये क्लीन चीट मिळाल्याची जोरदार चर्चा आहे. त्यामुळे या प्रकरणांवरुन नागपूरच्या विधिमंडळ अधिवेशन गाजण्याची चिन्हे आहेत. विरोधकांकडून हा प्रश्न उपस्थित करीत पुन्हा चौकशीची मागणी होण्याची शक्यता आहे.

मोहित कंबोज यांच्यावर आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले होते. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्या कार्यकाळातील हा प्रकार आहे. कथित बँक घोटाळाप्रकरणात कंबोज यांना आर्थिक गुन्हे शाखेकडून क्लीन चीट देण्यात आल्याचे सांगितले जाते. शस्त्र कायद्यांतर्गत दाखल झालेल्या गुन्ह्यातूनही त्यांची सुटका झाल्याचे बोलले जाते.

मोहित कंबोज यांच्या कंपनीने सन २०११ ते २०१५ या कालावधीत इंडियन ओव्हरसीज बँकेकडून ५२ कोटी रुपये कर्ज घेतले होते. मात्र, कंबोज यांनी हे कर्ज इतरत्र वापरले आणि ५२ कोटी रुपयांचे कर्ज बुडवल्याचा आरोप होता. याप्रकरणी कंबोज आणि त्यांच्या कंपनीच्या दोन संचालकांविरोधात माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्या कार्यकाळात गुन्हा दाखल झाला होता. फसवणूक आणि कट रचणे असा आरोप कंबोज यांच्यावर होता. त्यानंतर, कंबोज यांनी थेट संजय पांडे यांना आव्हान दिले होते. आता या गुन्ह्यामध्ये मोहित कंबोज यांना दिलासा मिळाला आहे. तसेच, आर्म्स अॅक्ट अंतर्गत दाखल झालेल्या गुन्ह्यांतही त्यांना क्लीनचिट मिळाली आहे.

याप्रकरणी कंबोज म्हणाले होते की, मला कळाले मुंबई पोलिसांनी माझ्याविरोधात एफआयआर दाखल केली आहे. एक जुनी कंपनी जी २०१७ मध्ये बंद झाली आहे. त्याचे बॅंक इश्यूज काढून माझ्यावर गुन्हा दाखल केला आहे. महाविकास आघाडी सरकार असे करून माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असेल किंवा मला धमकावण्याचा प्रयत्न करत असेल तर तसे होणार नाही.

सध्या विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. त्यामुळे राजकीय वातावरण विविध मुद्द्यांवरून तापले आहे. अशातच भाजपा नेत्याला क्लीनचिट मिळाल्यामुळे याचे पडसाद आता विधिमंडळातही उमटण्याची शक्यता आहे. दरम्यान, क्लीनचिट मिळाल्यानंतर मोहित कंबोज यांनी ट्वीट करत विरोधकांवर निशाणा साधला आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, मेरी हिम्मत को परखने की गुस्ताखी न करना ,
पहले भी कई तूफानों का रुख मोड़ चुका हु!

मेरी हिम्मत को परखने की गुस्ताखी न करना ,
पहले भी कई तूफानों का रुख मोड़ चुका हु ! pic.twitter.com/fMZLiVaBz2

— Mohit Kamboj Bharatiya (@mohitbharatiya_) December 23, 2022

BJP Leader Mohit Kamboj Clean Chit in Fraud Case


Previous Post

अखेर ‘त्या’ पोलिस निरीक्षकाची नियंत्रण कक्षात बदली; १५ दिवसात चौकशीचेही आदेश

Next Post

माजी मंत्री सुरेश जैन यांना एअर ॲम्बुलन्सने जळगावहून मुंबईला हलविले

Next Post

माजी मंत्री सुरेश जैन यांना एअर ॲम्बुलन्सने जळगावहून मुंबईला हलविले

ताज्या बातम्या

इंडिया दर्पण – विचार धन – वाचा आणि नक्की विचार करा

March 28, 2023

राज्यातील या ५ शहरांमध्ये सुरू होणार लू लू मॉल तर येथे सुरू होणार अन्न प्रक्रिया उद्योग

March 28, 2023

जालना, अंबड शहर पाणीपुरवठा योजनेबाबत झाला हा महत्वाचा निर्णय

March 28, 2023
प्रातिनिधीक फोटो

पुण्याच्या पाणी पुरवठ्याबाबत पालकमंत्र्यांनी दिले हे निर्देश

March 28, 2023

नागरिकांना आता कमी दरात मिळणार वाळू… असा आहे सरकारचा मेगाप्लॅन…

March 28, 2023

पठाणच्या अभूतपूर्व यशानंतर शाहरुख खानने घेतली ही आलिशान कार… एवढी आहे तिची किंमत.. अशी आहेत वैशिष्ट्ये

March 28, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group