अहमदनगर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राहुरी येथे बळजबरीने धर्मांतर करणाऱ्या कमल सिंग आरोपीवर कारवाई होत नसल्याबाबत आमदार राम सातपुते यांनी विधानसभेत लक्षवेधी उपस्थित केली. त्याची गंभीर दखल राज्य सरकारने घेतली. याप्रकरणी पोलिस निरीक्षक दराडे याची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. तसेच, यासंदर्भात १५ दिवसात चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेशही मंत्री शंभूराजे देसाई यांनी दिले आहेत.
आमदार सातपुते यांनी सांगितले की, राहुरी तालुक्यात ब्राह्मणी गावामध्ये कमल सिंग नामक ख्रिश्चन मिशनरी हा पोलिस निरीक्षक दराडे याच्या मदतीने नागरिकांना धर्मांतर करण्यास प्रवृत्त करत आहे. या समाजकंटकांनी आपल्या हिंदू देवदेवतांच्या प्रतिमांची विटंबना केलीच, सोबतच महिला भगिनींचा विनयभंगही केला आहे. मानवतेला काळिमा फासणाऱ्या प्रकाराला जबाबदार असणाऱ्या निरीक्षक दराडे याला तत्काळ बडतर्फ करण्याची मागणी सातपुते यांनी केली. महाराष्ट्रात धर्मांतर विरोध कायदा आणणार का, असे प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. यावर मंत्री शंभूराजे देसाई म्हणाले की, अधिकारी दराडे यांच्यावर १५ दिवसांत कठोर कारवाई करण्यात येईल. दराडे याची आज नियंत्रण कक्षात बदली करणार असल्याचे देसाई यांनी स्पष्ट केले.
Ahmednagar PI Transfer in Control Room