इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – सध्याच्या काळात मुले टेक्नोसॅव्ही झाली असून प्रत्येकाच्या हातात मोबाईल दिसून येतो. तर काही मुले तासन्तास टीव्ही आणि संगणकासमोर बसलेली दिसतात. त्यातच अनेक मुलांना ऑनलाइन गेम चा नाद जडल्याने त्यापासून अनेक तोटे होतात. इतकेच नव्हे तर त्यातून आर्थिक फसवणूक देखील होऊ शकते.
आता डिजिटल युगात ऑनलाइन फसवणूकही झपाट्याने वाढत आहे. हॅकर्स गेम्स अॅपद्वारे सर्व प्रकारच्या आकर्षक ऑफर्स देऊन नागरिकांचा महत्त्वाचा डेटा चोरतात. या ऑनलाइन गेममुळे आपले बँक खाते रिकामे होऊ शकते, मुलांना त्यापासून दूर ठेवावे आणि कसे रोखायचे ते जाणून घ्यावे. सध्या डिजिटल युगात अनेकांची ऑनलाइन गेम्सची क्रेझ वाढत आहे. पण ते सर्वांसाठी धोकादायक देखील असू शकते, त्यामुळे बँक खात्यातून पैसेही जाऊ शकतात.
अलीकडे, उज्जैनमध्ये अशीच एक घटना घडली, एका मुलाने ऑनलाइन गेममध्ये कूपन रिडीम करण्याच्या प्रकारात आजोबांचे बँक खाते रिकामे करण्याची चूक केली या सेवानिवृतकर्मचाऱ्याच्या खात्यातून २५,००० रुपये कापण्यात आले. त्यानंतर चौकशी केली असता असे आढळून आले की, कर्मचाऱ्याच्या मुलाने प्ले स्टोअरवरून अनेक गेम डाऊनलोड केले होते, त्याचे शुल्क भरावे लागले.
आता डिजिटल युगात ऑनलाइन फसवणूकही झपाट्याने वाढत आहे. हॅकर्स गेम्स अॅपद्वारे सर्व प्रकारच्या आकर्षक ऑफर्स देऊन ग्राहकांचा महत्त्वाचा डेटा चोरतात. यामुळे तुमचे खाते रिकामे देखील होऊ शकते. त्याच वेळी, अनेक ऑनलाइन गेमिंग अॅप्स आहेत जे ते वापरण्यासाठी अनेकांकडून जास्त पैसे आकारतात किंवा त्या बदल्यात आपला आवश्यक डेटा इतर प्लॅटफॉर्मवर देतात. या परिस्थितीत आपण सुरक्षित राहणे आवश्यक आहे. फोन सुरक्षित कसा ठेवायचा ते जाणून घ्या, त्याकरिता ऑनलाइन फसवणुकीच्या बाबतीत, सरकारने टोल फ्री क्रमांक-155260 तयार केला आहे. ऑनलाइन फसवणूक झाल्यास या क्रमांकावर कॉल करून माहिती द्यावी, सायबर सेल अशा केसेस तातडीने सोडवण्याचा प्रयत्न करतो.