इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – अन्न, वस्त्र, आणि निवारा या मानवाच्या मूलभूत गरजा आहेत. परंतु आपल्या देशात असे लाखो लोक आहेत की, ज्यांना दोन वेळचे अन्न मिळत नाही. अंगावर घेण्यासाठी पुरेसे वस्त्रे देखील नाहीत. आणि विशेष म्हणजे अनेक लोकांना स्वतःचे घर देखील नसते, ती अगदी उघड्यावर रस्त्याच्या कडेला आपली रात्र घालवतात, तर काही चक्क हात गाडीवर झोपतात, अशाच एका आगळ्यावेगळ्या माणसाने आपला स्वतःचा निवारा नसताना त्याने कुत्र्यासाठी मात्र एक छानसे घर बनवले.
सोशल मीडियावर येणारे काही व्हिडिओ किंवा फोटो असे असतात की ते आपल्याला आयुष्यातील एक चांगली शिकवण देतात. असाच एक फोटो सोशल मीडियावर सध्या चांगलाच व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका फेरीवाल्यांनी आपल्या कुत्र्यांसाठी आलिशान आश्रयस्थान बनवले आहे. विशेष म्हणजे या माणसाकडे स्वतःचे छत किंवा छप्पर नाही, पण जे काही आहे, ते डोके वापरून त्याने कुत्र्यांचे डोके लपवण्याची मोठी व्यवस्था केली आहे. कदाचित त्याच्याकडे कमी पैसा आहे, परंतु त्याचे हृदय मोठे आहे. हा फोटो आयपीएस अधिकारी दीपांशु काबरा यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. या फोटोसोबत त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, काही जण इतके गरीब असतात की, त्यांच्याकडे देण्यासाठी फक्त ‘पैसा ‘ असतो आणि काही लोक मनाने इतके श्रीमंत असतात.
व्हायरल होत असलेल्या या फोटोमध्ये आपण पाहू शकतो की, एक माणूस स्वत: हातगाडीवर पडलेला आहे, परंतु त्याच्या वर त्याने कुत्र्याला झोपण्यासाठी बेड देखील बनवला आहे. कुत्र्याच्या जगण्याचा हा भागही तिने अतिशय सुंदरपणे सजवला आहे. हा फोटो सोशल मीडियावर पोस्ट होताच व्हायरल झाला आहे. यावर आतापर्यंत हजारो लाईक्स आणि कमेंट्स येत आहेत. प्रत्येकजण त्या व्यक्तीचे मनापासून कौतुक करत आहे.