India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

पोलिसांना हवा असलेला अमृतपाल सिंग नांदेडमध्ये? पोलिसांकडून जोरदार सर्च ऑपरेशन, समर्थकांची झाडाझडती

India Darpan by India Darpan
March 27, 2023
in संमिश्र वार्ता
0
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

प्रातिनिधीक संग्रहित फोटो


नांदेड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – वारीस दे पंजाब या खलिस्तान समर्थक संघटनेचा प्रमुख अमृतपाल सिंगचा अद्याप शोध लागलेला नाही. देशभरातील विविध राज्यांमध्ये त्याचा शोध घेण्यात येत आहे. दरम्यान अमृतपालसिंगच्या समर्थकांचा शोध घेण्यासाठी नांदेड पोलिसांद्वारे विशेष मोहीम राबविण्यात आली.

अमृतपाल सिंग ‘वारिस पंजाब दे’ संघटनेचा प्रमुख असून, त्याचा जन्म १९९३ मध्ये अमृतसर जिल्ह्यातील जल्लूपूर खेडा गावात झाला. तर अमृतपाल तरसेम सिंह यांचा तो मुलगा आहे. अमृतपाल २०२१ मध्ये वयाच्या १९ व्या वर्षी पंजाबहून दुबईला नोकरीसाठी गेला होता. तो १० वर्षे म्हणजे २०२२ पर्यंत दुबईत वास्तव्यास होता. दुबईत त्याच्या काकांचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय होता.

शेतकरी आंदोलनादरम्यान अमृतपाल दीप सिद्धूसोबत दिल्ली सीमेवर आला. त्याने सप्टेंबर २०२२ मध्ये पुन्हा केस ठेवून दस्तरबंदी केली आणि मोगाच्या रोडे गावात दस्तरबंदीचा मोठा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यानंतर तो दीप सिद्धूच्या ‘वारिस पंजाब दे’ या संघटनेचा प्रमुख बनला. अमृतपालने पंजाबमध्ये धार्मिक यात्राही सुरू केली. खलिस्तानी चळवळीत ग्रामीण तरुणांना सामील करण्यास सुरुवात केली असल्याचे बोलले जात आहे.

शांतता भंग करण्याचा प्रयत्न
नांदेड शहरात वारीस दे पंजाब या संघटनेचे अनेक सदस्य आहेत. तसेच काही तरुण भिंद्रानवालेचेचे छायाचित्र आपल्या सोशल मीडियाच्या स्टेट्सवर ठेवतात. त्यामुळे अशा परिस्थितीत अमृतपाल नांदेडात येण्याची शक्यताही वर्तविण्यात आली होती. त्यामुळे नांदेड पोलिस अलर्ट झाली असून, पोलिसांनी शनिवारी रात्री शहरातील काही भागात कोम्बिंग ऑपरेशन राबविले आहे. यावेळी अनेकांची कसून चौकशी देखील करण्यात आली. विशेष म्हणजे नांदेड शहरात सोशल मीडियाद्वारे सामाजिक शांतता भंग करण्याचा प्रयत्न होऊ शकतो. त्यामुळे पोलिसांच्या सायबर सेलकडून सोशल मीडियावर वॉच ठेवण्यात येत आहे.

Amritpal Singh Nanded Police Search Operation Crime


Previous Post

जळगावातील धक्कादायक प्रकार! अवघ्या दीड वर्षांच्या बाळाला ४ दिवसात ४ इंजेक्शन… अखेर बाळाचा मृत्यू.. डॉक्टरवर गुन्हा दाखल

Next Post

खासदारकी गेल्यानंतर राहुल गांधींच्या अडचणीत वाढ; लोकसभा सचिवालयाने पाठवली ही नोटीस

Next Post

खासदारकी गेल्यानंतर राहुल गांधींच्या अडचणीत वाढ; लोकसभा सचिवालयाने पाठवली ही नोटीस

ताज्या बातम्या

ओडिशातील भीषण रेल्वे अपघातात मृतांचा आकडा २४०, तर जखमींची संख्या १ हजारावर

June 3, 2023

रेल्वेचा एवढा भीषण अपघात का आणि कसा झाला? तो टाळता आला असता का?

June 3, 2023

ड्रायव्हर आजारी पडल्याने अभिनेता संकर्षण कऱ्हाडेने चालवली बस (व्हिडिओ)

June 3, 2023

शरद पवार-गौतम अदानी भेटीने उंचावल्या सर्वांच्या भुवया; ही आहे बातमी मागची बातमी

June 3, 2023

झंझटच मिटली… कोरड्या हवामानात आणि अत्यल्प पाण्यात टिकणार ही वनस्पती.. शेतकऱ्यांसाठी ठरणार वरदान

June 3, 2023
विमानसेवेचे प्रातिनिधीक छायाचित्र

विमान तिकीटावर ४० टक्के, हॉटेल बुकींग्जवर ६० टक्के सूट; असा घेता येईल लाभ

June 3, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group