India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

अदानी समुहात गुंतवणूक करणाऱ्या LIC आणि SBIचे कोट्यवधींचे नुकसान; अर्थमंत्र्यांचेही मौन

India Darpan by India Darpan
January 29, 2023
in महत्त्वाच्या बातम्या
0

 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अदानी समूहातील गुंतवणुकीमुळे भारतीय आयुर्विमा महामंडळ (एलआयसी) आणि स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय)च्या शेअर्सचे ७८ हजार कोटी रुपयांहून अधिक नुकसान झाले आहे. यावरुन काँग्रेसने केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. याप्रश्नी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि तपास यंत्रणांच्या मौनावर काँग्रेसने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

काँग्रेसचे सरचिटणीस रणदीप सूरजेवाला यांनी दावा केला की, एलआयसी आणि एसबीआयने अदानी समूहामध्ये गुंतवणूक करणे सुरूच ठेवले आहे, हिंडेनबर्ग संशोधन अहवालात समभागाच्या किमतीत फेरफार आणि समूहाच्या बाजूने आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप झाल्यानंतरही गुंतवणूक केली जात आहे. एलआयसीचा पैसा हा जनतेचा आहे! हिंडेनबर्गच्या अहवालानंतर, अदानी समूहाच्या शेअर्समधील एलआयसीच्या गुंतवणुकीचे मूल्य ७७,००० कोटी रुपयांवरून ५३,००० कोटी रुपयांवर घसरले. २३,५०० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. याशिवाय एलआयसीला २२४४२ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

एवढं होऊनही एलआयसी अदानी समूहात ३०० कोटींची गुंतवणूक का करत आहे, असा सवाल त्यांनी केला. काँग्रेस नेत्याने दावा केला की अहवाल प्रकाशित झाल्यानंतर, एसबीआयच्या स्टॉकची मार्केट कॅप तब्बल ५४,६१८ कोटी रुपयांनी घसरली आहे. याशिवाय एसबीआय आणि इतर बँकांचे अदानी समूहाकडे सुमारे ८१,२०० कोटी रुपयांचे कर्ज असल्याचा दावा त्यांनी केला. या सगळ्या दरम्यान, SBI कर्मचारी पेन्शन फंड आणि SBI Life अजूनही अदानी समूहात २२५ कोटी रुपयांची गुंतवणूक का करत आहेत, असा मोठा प्रश्न सुरजेवाला यांनी विचारला आहे. २४ ते २७ जानेवारी दरम्यान, SBI आणि LIC एकट्याने त्यांच्या शेअर्सच्या मूल्यात ७८,११८ कोटी रुपयांचे मार्केट कॅप गमावल्याचे सुरजेवाला यांनी स्पष्ट केले आहे.

#SBI & other Banks exposure in Adani Group is ₹81,200 CR.

Add, #LIC ‘s invest value in Adani is ₹77,000 CR & post #Hindenburg report, it has lost ₹23,500 CR.

Anywhere else, PM would be asked to explain. FM would be sacked. A full investigation would have been ordered.

— Randeep Singh Surjewala (@rssurjewala) January 27, 2023

Adani Group LIC SBI Crore Loss Share Market


Previous Post

काय सांगता? तब्बल एक लाख एकर शेतीला बांधच नाही! कुठे आणि कसं काय?

Next Post

इंडिया दर्पण – विचार धन – वाचा आणि नक्की विचार करा

Next Post

इंडिया दर्पण - विचार धन - वाचा आणि नक्की विचार करा

ताज्या बातम्या

राजधानीत गुढीपाडवा साजरा; सिन्नर तालुक्यातील बाल वारकऱ्यांच्या अभंगातून सारेच थक्क

March 22, 2023

हज यात्रेच्या नावाखाली आर्थिक फसवणूक; चार जणांविरूध्द गुन्हा दाखल

March 22, 2023

नंदुरबार जिल्ह्यात शेतपिकांची पाहणी केल्यानंतर कृषीमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले…

March 22, 2023

या अनोख्या एटीममधून मिळते कापडी पिशवी; विटा नगरपरिषदेचा अनोखा उपक्रम

March 22, 2023
प्रातिनिधिक फोटो

सावरकरनगरचे न्यू टकले ज्वेलर्स शोरूम फोडले; २६ लाखाचे अलंकार लंपास

March 22, 2023

आजपासून सुरू झाले हिंदू नववर्ष; यंदा आहेत १३ महिने, जाणून घ्या याविषयी सर्व काही…

March 22, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group