नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सातपूर पोलिस स्टेशन जवळ दुपारी दीड वाजेच्या सुमारास तीन गाड्यांच्या अपघातात दुचाकीस्वार किरकोळ जखमी झाला आहे. या अपघाता दुचाकीसह दोन चारचाकी वाहनांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या ठिकाणी नेहमी अपघात होत असतात. त्यामुळे या ठिकाणी वाहतूक पोलिसांची नेमणूक करावी अशी स्थानिक नागरिकांनी मागणी केली आहे.