अजय सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
सण व संस्कृतीची परंपरा जोपासणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील येवला शहरात सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या धडपड मंचतर्फे अनेक वर्षापासून गोकुळ अष्टमी निमित्त श्रीकृष्ण पेहरावतील बाळ गोपाळांच्या वेशभूषेच्या स्पर्धा घेण्यात येतात. कोरोना काळात दोन वर्ष खंडीत झालेली ही वेशभूषा स्पर्धा या वेळी मोठ्या उत्साहात संपन्न झाली. रडणारा तर कधी आपल्यात मस्तीत बागडणारा असे लहानग्यांचे बाळ गोपाळ श्री कृष्णाचे विविध अवतार यावेळी पहावयास मिळाले. या स्पर्धेत भाग घेतलेल्या स्पर्धकांना बक्षिसे देण्यात आली. पाहूया बाळ गोपाळांच्या विविध रूपातील या लीला..