गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

आता विजयासाठी तुतारी वाजवायची आहे, भाजपाला हात दाखवून मशाल पेटवायची..आदित्य ठाकरे

by India Darpan
मे 10, 2024 | 7:02 pm
in संमिश्र वार्ता
0
IMG 20240510 WA0051


उरण (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – लोकसभा निवडणुकीत ४०० पार म्हणणाऱ्या भाजपाला तडीपार करण्यासाठी आता विजयासाठी तुतारी वाजवायची आहे.भाजपाला हात दाखवून मशाल पेटवायची आहे.असे आवाहन युवा नेते आदित्य ठाकरे यांनी उरणच्या जाहीर सभेतून केले. मावळ लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे-पाटील यांच्या प्रचारासाठी दि ९ मे २०२४ रोजी नगर परिषद शाळा मैदान,पेन्शनर्स पार्क उरण शहर येथे संध्याकाळी ८ वाजता जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते.

उरण नगरपरिषदेच्या तिर्थरुप नानासाहेब धर्माधिकारी मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या जाहीर प्रचार सभेत उबाठाचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी भाजपप्रणीत केंद्र व राज्य सरकारच्या कारभारावर चांगलेच टिकेचे आसूड ओढले. दक्षिणेकडील राज्यांनी ठरवले आहे की भाजपला डोक्यावर बसवायचे नाही. उत्तर भारतातही बदल, परिवर्तनाचे वारे वाहत आहेत. महाराष्ट्रातही अशीच स्थिती आहे. त्यामुळे अब की बार ४०० पारची घोषणा करणारे भाजप चंद्रावरून की अमेरिकेतून कुठून ४०० पार करणार असा रोखठोक सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला.

लोकसभा निवडणूकीत भाजप विरुद्ध भारत अशी लढाई आहे. संविधान वाचवण्यासाठी ही लढाई आहे. देश,महाराष्ट्र विरोधी भाजप आहे.त्यामुळे देशभरातील विविध राज्यात केंद्र सरकारचे अत्याचार वाढतच चालले आहेत. भाजपचे प्रज्वल रेवण्णा यांनी घरातील आणि पक्षातील हजारो महिलांचा अमानुषपणे छळ करुन बलात्कार केला. अशा रेवण्णाच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी गेले होते. मतदान झाल्यानंतर त्याला विदेशात पळून जाण्यासाठीही त्यांनी मदत केली असल्याचा गंभीर आरोपही आदित्य ठाकरे यांनी भाषणातुन केला. २०२२ मध्ये गद्दारी, पक्ष फोडाफोडी करण्याच्या भाजपच्या गलिच्छ राजकारणा विरोधात लढत आहोत. गद्दारीने राज्याच्या सत्तेवर आलेल्यांमध्ये काही मंत्री भ्रष्टाचारांनी बरबरटले आहेत. उत्तर प्रदेशातही महाराष्ट्राप्रमाणेच पलटीराम निघाले आहेत. ३७० कलम रद्द करुनही काश्मीरमधील ना दहशतवाद संपला, ना पंडितांना चांगले दिवस आले ,ना भरभराट झाली. आज तिथे परिस्थिती गंभीर आहे.

त्यामुळे मात्र भाजपला निवडणुकीत उमेदवारही मिळाले नाहीत. केंद्रशासित लडाखमध्ये सामान्य जनतेला संघर्ष करावा लागत आहे. लडाखला राज्याचा दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचा दावाही आदित्य ठाकरे यांनी भाषणातून केला. गद्दारांना ५० खोके सामान्यांच्या बॅक खात्यात १५ लाख आले का.शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट झाले का.पंतप्रधान आवास योजनेतून घरे मिळाली का.शेतकऱ्यांना लाभ मिळाला का.असे अनेक प्रश्न आदित्य यांनी भाषणातुन उपस्थित केले.आज देशात महागाई ,बेरोजगारी आणि महिलांवर अत्याचाराचे प्रमाण वाढतच आहे.जिथे महिलांची संख्या अधिक तिथे विश्वासही अधिक त्यामुळे विश्वास तिथे विजय याकडेही आदित्य ठाकरे यांनी जाहीर सभेत लक्ष वेधले.

दोन वर्षं भाजप सरकार आपल्या डोक्यावर बसले आहे.कधी पाहिले आहे का नवीमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला भाजपने दि.बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी करताना.तसेच संभाजी नगरला विमानतळाला उध्दव ठाकरे यांनी छत्रपती संभाजी महाराज विमानतळ नाव देण्याचा प्रस्ताव केला होता. मात्र अडीच वर्षे झाली भाजप सरकारने नाव दिले नाही.याच्याही पलिकडे जाऊन पाहिले तर गोव्यामध्ये एअर पोर्टला मनोहर पर्रीकर यांचे नाव दिले आहे. अयोध्येतील एअरपोर्टचे नाव वाल्मिकी एअरपोर्ट केले आहे.आमचा काही आक्षेप नाही.मात्र उत्तर प्रदेश, गोवा येथील विमानतळाचे नाव बदलले आहे.तर मग महाराष्ट्राने काय चुक केली आहे.नवीमुंबई विमानतळाला तुम्ही दि.बा. पाटील यांचे नाव का देत नाहीत.

संभाजीनगरातील विमानतळाला छत्रपती संभाजी महाराज नाव का देत नाही.अशा महाराष्ट्र व्देषी भाजपाला या महाराष्ट्र व्देषी मिंधे सरकारला तुम्ही मतदान करणार का .हेच नाही तर आपले उद्योगधंदे गुजरातला घेऊन गेले आहेत.त्यामुळे आता केंद्र सरकार बदलायचे आहे.महाराष्टातील तरुणांचा हक्काचा रोजगार तुम्ही गुजरातला नेणार तर आम्ही तुम्हाला नडणारच.त्यामुळे आता महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मतदान करुन महाराष्ट्राचा, देशाचा अंधकार दूर करून टाका असे आवाहनही आदित्य ठाकरे यांनी यावेळी केले. यावेळी उरणमध्ये शरद पवार गटाच्या माध्यमातून जितेंद्र आव्हाड यांनी भाजपवर तोफ डागली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या नेत्यांवर आव्हाड यांनी सडकून टीका केली.मराठी शाहीचा सत्यानाश करणारे देवेंद्र फडणवीस दुसरे फडणवीस अशी खोचक टीका करताना ८४ टक्के तरुण बेरोजगार असलेल्या भारत देशाचे भविष्य काय असा कडवट सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

जेएनपीए साडेबारा टक्के विकसित भुखंड वाटप, हनुमान कोळीवाडा पुनर्वसन प्रश्न मार्गी लावा असे आवाहन शेकाप आमदार जयंत पाटील यांनी यावेळी केले.तर मावळ मतदारसंघात बारणे यांनी केलेल्या विकासकामांचा सध्या शोध घेत असल्याची टीका महाविकास आघाडीचे मावळचे उमेदवार संजोग वाघेरे-पाटील यांनी केली.याप्रसंगी शेकापचे रमाकांत म्हात्रे ,एल.बी.पाटील तर माकपचे भुषण पाटील यांचीही भाषणे झाली.यावेळी माजी खासदार अनंत गीते , बबनदादा पाटील, जिल्हा प्रमुख माजी आमदार मनोहर भोईर, जेएनपीए कामगार विश्वस्त दिनेश पाटील, जिल्हा उपप्रमुख नरेश रहाळकर, कॉग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत , काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद पाडगावकर , तालुका अध्यक्ष विनोद म्हात्रे,उरण उत्कर्ष समितीचे अध्यक्ष गोपाळ पाटील , राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रशांत पाटील ,भावना घाणेकर, आम आदमी पार्टीचे अध्यक्ष संतोष भगत आणि महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

व्दारका परिसरात भरदिवसा घरफोडी…चोरट्यांनी ९२ हजाराचा ऐवज केला लंपास

Next Post

पत्र्याचे शेड उभारणा-या ठेकेदाराने वृध्दास एक लाख रूपयाला घातला गंडा

India Darpan

Next Post
crime diary 2

पत्र्याचे शेड उभारणा-या ठेकेदाराने वृध्दास एक लाख रूपयाला घातला गंडा

ताज्या बातम्या

Corruption Bribe Lach ACB

आठ हजाराची लाच घेणारे दोन वनपाल एसीबीच्या जाळ्यात

जुलै 3, 2025
cricket

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या विविध समित्यांवर नाशिक जिल्हा क्रिकेटचे सहा जण…

जुलै 3, 2025
crime1

२५ वर्षीय तरूणावर चॉपरने वार करुन प्राणघातक हल्ला…दिंडोरीरोडवरील घटना

जुलै 3, 2025
CM

या १७ प्रकल्पांमधून रूपये १,३५,३७१.५८ कोटी एवढी नवीन गुंतवणुक….१ लाख रोजगारनिर्मिती

जुलै 3, 2025
Vidhanparishad Lakshavedhi 02 1024x512 1

राज्यातील शाळांमध्ये कमी पटसंख्या असल्यानंतर शाळा बंद होणार? विधानपरिषदेत लक्षवेधीला सरकारचे उत्तर

जुलै 3, 2025
cm shinde sir1 e1729932401687

राज्यातील विनाअनुदानित शाळांच्या अनुदानाबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली ही माहिती…

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011