India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

येवला तालुक्यातील जवान अजित शेळके यांचा राजस्थानात अपघाती मृत्यू; मानोरी बु. गावावर शोककळा

India Darpan by India Darpan
March 19, 2023
in स्थानिक बातम्या
0

 

येवला (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येवला तालुक्यातील मानोरी बुद्रुकचे सुपुत्र तथा जवान अजित शेळके यांचा देशसेवेचे कर्तव्य बजावत असताना अपघातात मृत्यू झाला आहे. त्यांच्या निधनाने गावावर शोककळा पसरली आहे. येवला तालुक्यातील ग्रामीण भागातून पुढे येऊन शिक्षण घेत सैन्यदलात भरती झालेले वीरजवान अजित शेळके यांनी सैन्यदलात अतिशय उत्कृष्ट कामगिरी बजावली. त्यांच्या निधनाने भारत मातेने एक वीर सुपुत्र गमावला आहे. मी व माझे कुटुंबीय शहीद जवान शेळके कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असून ईश्वर मृताच्या आत्म्यास चिरशांती देवो हीच प्रार्थना करतो, असे येवल्याचे आमदार छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.

राजस्थानातील गंगानगर येथे ते सेवेत होते. वयाच्या अवघ्या २९ व्या वर्षी जवान अजित शेळके यांचा मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. अजित हे ड्युटीवरून घरी जात होते. त्याचवेळी त्यांचा अपघात झाला. या अपघातात त्यांच्या डोक्याला जबर मार लागला. त्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, वडील, भाऊ, वहिनी असा परिवार आहे.

Yeola Javan Ajit Shelake Death in Rajasthan

 


Previous Post

गोविंद बोरसे आणि प्रविण अलई यांची भाजपा महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी निवड

Next Post

नंदुरबार जिल्ह्यात अनेक गावात जोरदार गारपीट; शेतपिकांचे मोठे नुकसान, पालकमंत्र्यांकडून पाहणी

Next Post

नंदुरबार जिल्ह्यात अनेक गावात जोरदार गारपीट; शेतपिकांचे मोठे नुकसान, पालकमंत्र्यांकडून पाहणी

ताज्या बातम्या

सकाळी नाश्ता न केल्यास कॅन्सरचा धोका ? खरं काय आहे

October 3, 2023

खामगावातील गजानन महाराजांच्या वेशात आलेल्या व्यक्तीचे सत्य झाले असे उघड

October 3, 2023

गोदरेज कुटुंबात फूट, कंपन्यांची होणार फाळणी

October 3, 2023
प्रातिनिधीक फोटो

ग्रामविकास विभागाच्या पदभरतीचा ७ ते ११ ऑक्टोबर २०२३ दरम्यान पहिला टप्पा

October 3, 2023
राशीभविष्य

या व्यक्तींनी व्यवहार करताना घ्यावी काळजी, जाणून घ्या बुधवार ४ ऑक्टोंबर २०२३चे राशिभविष्य

October 3, 2023

सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया ९ ऑक्टोबर पासून सुरू, असा आहे निवडणूक कार्यक्रम

October 3, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group