India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

गोविंद बोरसे आणि प्रविण अलई यांची भाजपा महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी निवड

India Darpan by India Darpan
March 19, 2023
in स्थानिक बातम्या
0

 

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भाजपा विभागीय प्रसिध्दी प्रमुख गोविंद बोरसे व भाजपा प्रदेश सोशल मिडीया माजी संयोजक प्रविण अलई यांची भाजपा महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी निवड झाल्याची माहिती भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावळकुळे यांनी प्रदेश कार्यालयातून प्रसिध्दी पत्रकाद्वारे जाहीर करण्यात आले व त्यांच्या निवडीचे पत्र त्यांना देण्यात आले.

या निवडीबद्दल केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ भारती पवार, नामदार गिरीष महाजन, खा.उन्मेश पाटील, खा.सुभाष भामरे, खा.हिना गावित, प्रदेश उपाध्यक्ष जयकुमार रावल, प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारी, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष आ.राम शिंदे, आ.श्रीकांत भारतीय, प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, प्रदेश माध्य विभाग व प्रसिध्दी प्रमुख नवनाथ बन, भाजप शहर अध्यक्ष गिरीष पालवे, आ. देवयानी फरांदे, आ. सीमा हिरे, आ. राहुल ढिकले, नाशिक जिल्हा ग्रामीण अध्यक्ष केदा आहेर, प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी, प्रदीप पेशकर, विजय साने, संघटन सरचिटणीस प्रशांत जाधव, पवन भगूरकर, सुनिल केदार, जगन आण्णा पाटील तसेच शहर, मंडल, उत्तर महारष्ट्रातील भाजपा आमदार, खासदार, पदाधिकारी विविध आघाड्या प्रकोष्ट, मोर्चे यांच्या पदाधिकारी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

निवडीचे पत्र मिळाल्यानंतर गोविंद बोरसे व प्रविण अलई यांनी सांगितले की पक्षाच्या धेय धोरणांचे पालन करून पक्षाकडून आलेले विविध विषय माध्यमातून जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहचवू. दरम्यान 2012 पासून गोविंद बोरसे यांनी शहर प्रसिध्दी प्रमुख, सोशल मिडीया प्रदेश सह संयोजक तसेच विभागीय प्रसिध्दी प्रमुख आदी पदांवर परिणामकारक रित्या काम केले. हे कार्य डोळयापुढे ठेवून भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्यावर विश्वास टाकून भाजपा महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी निवड केली. तर प्रविण अलई यांनी हि जिल्हा सोशल मिडीया संयोजक, जिल्हा प्रसिध्दी प्रमुख, विभागीय सोशल मिडीया सह संयोजक, महाराष्ट्र प्रदेश सोशल मिडीया संयोजक आदी पदावर यशस्वी काम केले म्हणून त्यांना त्यांच्या कार्याचा अनुभव बघता प्रदेश प्रवक्ते म्हणून त्यांची निवड करण्यात आली.

Govind Borse Pravin Alai BJP Spokesperson Appointment


Previous Post

गारपीट म्हणजे काय? ती का होते? सर्वत्र का होत नाही? जाणून घ्या तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरे…

Next Post

येवला तालुक्यातील जवान अजित शेळके यांचा राजस्थानात अपघाती मृत्यू; मानोरी बु. गावावर शोककळा

Next Post

येवला तालुक्यातील जवान अजित शेळके यांचा राजस्थानात अपघाती मृत्यू; मानोरी बु. गावावर शोककळा

ताज्या बातम्या

वॉशिंग मशीन…. गुजरात निरमा…. बॅनरने वेधले विधिमंडळात सर्वांचे लक्ष

March 24, 2023

धक्कादायक! सर्वात मोठे डेटा लीक उघड… १.२ कोटी WhatsApp, १७ लाख Facebook युजर्सचा डेटा चोरीला… ७ जणांना अटक

March 24, 2023

महाराष्ट्रातील या ९ शहरांमध्ये राबविला जाणार स्वच्छ हवा कार्यक्रम

March 24, 2023

हे आहेत महाराष्ट्राचे ‘महाराष्ट्र भूषण’… आजवर यांचा झाला सन्मान

March 24, 2023

इंडिया दर्पण – विचार धन – वाचा आणि नक्की विचार करा

March 24, 2023

अमिताभ बच्चन यांना होतायत अतीशय तीव्र वेदना; त्यांनीच शेअर केला दुखापतीनंतरचा अनुभव

March 24, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group