साप्ताहिक राशिभविष्य – १३ ते २० नोव्हेंबर २०२२
मीन – या सप्ताहात मागील अनेक प्रसंगात आपण ज्यांना मदत केली अशी मंडळी त्याची जाणीव ठेवून आपणासही मदत करतील. काही प्रसंगात असे न झाल्यास अशावेळी असे अनुभव खिलाडू वृत्तीने घ्यावे…..
कुंभ – गुंतवणुकीसाठी निवडलेल्या विविध योग्य पर्यायांचा उपयोग या सप्ताहात होणार आहे. अशावेळी शक्यतो पुर्नगुंतवणूक करण्यासाठी पर्याय शोधावे…..
मकर – नोकरदार व्यक्तींसाठी हा सप्ताह थोडा अनुभवाचा राहू शकतो. आपण वेळोवेळी आऊट ऑफ जाऊन केलेली कामे याचे श्रेय वरिष्ठांकडून मिळेलच अशी अपेक्षा ठेवू नये…..
धनु – स्थावर मालमत्तेबाबतचे प्रश्न या सप्ताहात येऊ शकतात. स्थावर मालमत्तेबाबत केलेली गुंतवणूक याबाबत पुनर्विचार करावा लागू शकतो….
वृश्चिक – या सप्ताहात विविध कारणाने मान अपमान प्रसंगास सामोरे जावे लागेल असे दिसतंय. पूर्वी आपल्याला आलेले परिचितांचे अनुभव या सप्ताहात निर्णय घ्यायला कमी येतील……
तूळ – परदेश गमन, परदेश प्रवास, इम्पोर्ट, एक्स्पोर्ट, विदेशी शिक्षण या क्षेत्रातील मंडळींना या सप्ताहात विविध प्रकारच्या शुभ वार्ता मिळू शकतात…..
कन्या – जवळची मंडळी ऐनवेळी महत्त्वाच्या कामात अपेक्षाभंग करू शकतात. असा प्रसंग मनाला चुटपुट लावून शकतो. पुढील वेळेस संभाळावे…..
सिंह – मोठे आर्थिक व्यवहार जवळच्या नातेवाईकांच्या साहाय्याने पार पडतील. परंतु एखादा गुंतागुंतीचा निर्णय विचारपूर्वक घेणे आवश्यक आहे. त्यामुळे कटूता येणे संभव आहे……
कर्क – या सप्ताहात सामाजिक क्षेत्रात वावरताना सावधपणे मतप्रदर्शन करणे आवश्यक आहे. सार्वजनिक क्षेत्रातील कामाबाबत गुणगौरव होईल. महत्त्वाच्या वस्तू सांभाळा……
मिथुन – वात प्रकोप, हाडांचे दुखणे याचा त्रास सांभाळा. सहज होईल अशा कामात अनपेक्षित दिरंगाई होण्याचा प्रसंग अगोदरच लक्षात घ्यावा…..
वृषभ – आपल्या भविष्यकालीन महत्त्वाच्या गोष्टी शेअर करू नये. त्या झाल्यावर आपोआप कळणारच असतात. आधी सांगितल्यास तळ्यात मळ्यात होऊ शकते……
मेष – विविध प्रकारचे आपल्याला उपयोगी असे बदल या सप्ताहात होऊ शकतात. त्यामध्ये नोकरदार अथवा व्यवसायातील संकल्पना विषयक गुंतवणूक विषयक हे बदल असू शकतात……
आजचा राहू काळ
दुपारी साडेचार ते सहा आहे
सविस्तर मार्गदर्शनासाठी भवानी ज्योतिष पंडित दिनेशपंत अपॉइंटमेंट साठी व्हाट्सअप 93 73 91 34 84