पाटणा (बिहार) – भारतात शैक्षणिक क्षेत्राच्या बाबतीत अतिशय चिंताजनक स्थिती आहे. सरकारी शाळांमध्ये पुरेशे वर्ग नाहीत, शिक्षक नाहीत, सुविधा नाहीत, स्वच्छतागृहांची बोंब या अशा अनेक बाबी सर्वख्यात आहेत. त्यामुळे खासकरुन ग्रामीण आणि दुर्गम भागात शिक्षणाची दशा अत्यंत वाईट आहे. त्यातच किहार जिल्ह्यातील एक व्हिडिओ समोर आला आहे. गंगा नदीच्या किनाऱ्याला लागून असलेल्या शाळेचे वर्गच चक्क नदीस कोसळल्याचे दिसून येत आहे. ही बाब अतिशय गंभीर आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कुठलीही जिवीतहानी झालेली नाही. मात्र, हा प्रकार म्हणजे, लहान मुलांच्या जिवाशी खेळच असल्याचे बोलले जात आहे. बघा हा थरारक व्हिडिओ
@NitishKumarके शासन में कटाव निरोधी कार्यों का पोल खेलता कटिहार ज़िला का ये विडीओ शुक्रवार का हैं और देखिए कैसे सरकारी विद्यालय दो कमरे गंगा नदी के चपेट में आ गये @ndtvindia @Anurag_Dwary pic.twitter.com/jFgBQ2m5pH
— manish (@manishndtv) December 11, 2021