विचार पुष्प
तुम्हाला कधीतरी असा अनुभव आला आहे का?
भविष्यकाळी अमुक एक संकट येणार, अमुक अडचण येणार, मनाविरुद्ध गोष्ट घडणार अशा कल्पनेने मन गांगरलें असता परिस्थितीचे अधिक अचूक व सुस्पष्ट आकलन तुम्हास होते असा तुम्हाला कधीतरी अनुभव आला आहे का? आजच्या दिवसापुरत्या अन्नवस्त्र प्राप्तीसाठी व चांगल्या वर्तनासाठी मार्गदर्शन व्हावे म्हणून आपण रोजच्या रोज प्रार्थना केली व प्रयत्नपूर्वक वागलो; भूत, वर्तमान व भविष्य या तिन्ही काळांचें ओझें झुगारून दिलें, तर आपल्या जीवनात किती मोकळेपणा, साधेपणा व सरळपणा येईल ! सर्व व्यवहार मनःपूर्वक व खुल्या दिलानें होऊ लागतील. हाती असलेल्या कामातून अपूर्व आनंद मिळू लागेल. सर्व जग ओळखीचे वाटेल आणि तुम्ही अजातशत्रु होऊन जाल. सतत वर्तमानांत तुम्ही जगूं लागाल.
Vichar Pushpa Life Experience One Upon Time