India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

प्रवास होणार सुखकर! राष्ट्रीय महामार्गांवर मिळणार या सर्व सुविधा

India Darpan by India Darpan
March 3, 2023
in संमिश्र वार्ता
0

 

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – यापुढे राष्ट्रीय महामार्गावरील प्रवास अतिशय सुखकर होणार आहे. कारण, महामार्गांलगत आता विविध प्रकारच्या सुविधा प्रवाशांना मिळणार आहेत. त्यामुळे प्रवासाचा आनंद वाढतानाच विविध सोयी-सुविधांमुळे प्रवाशांना मोठाच दिलासा मिळणार आहे. त्यासाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने पुढाकार घेतला आहे.

राष्ट्रीय महामार्गावरील प्रवासाचा अनुभव सुधारण्यासाठी, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) आर्थिक वर्ष 2024-25 पर्यंत राष्ट्रीय महामार्ग आणि द्रुतगती मार्गांवर 600 पेक्षा जास्त ठिकाणी वेसाईड ॲमिनिटी (WSA), अर्थात रस्त्याच्या बाजूच्‍या असलेल्या सेवा मार्गांवर सुविधा विकसित करणार आहे. सध्या वापरात असलेल्या आणि यापुढे बांधल्या जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग आणि द्रुतगती मार्गांवर दर 40-60 किमी अंतरावर वेसाइड सुविधा विकसित केल्या जातील.

यामध्ये प्रवाशांसाठी इंधन भरण्याचे स्थानक, इलेक्ट्रिक चार्जिंग सुविधा, फूड कोर्ट, किरकोळ दुकाने, बँक एटीएम, चिल्ड्रन प्ले एरिया (लहान मुलांना खेळण्यासाठी सुविधा), वैद्यकीय दवाखाना, बालसंगोपन कक्ष, स्नानाची सुविधा असलेली प्रसाधनगृह, वाहन दुरुस्तीची सुविधा, वाहन चालकांसाठी विश्रांती स्थळ, स्थानिक हस्तकलेच्या जाहिरातीसाठी ‘व्हिलेज हाट’ यासारख्या सुविधा उपलब्ध केल्या जातील.

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने यापूर्वीच 160 ‘वेसाइड’सुविधांना विकासाची मान्यता दिली असून, यापैकी सुमारे 150 गेल्या दोन वर्षांत पुरस्कृत करण्यात आल्या आहेत. पुढील आर्थिक वर्षात आणखी 150 ‘वेसाइड’सुविधांना मान्यता देण्याचे नियोजन असून, यामध्ये अमृतसर-भटिंडा-जामनगर मार्गिका(कॉरिडॉर), दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्ग आणि दिल्ली-अमृतसर-कटरा द्रुतगती मार्ग यासारख्या हरित मार्गिका (ग्रीनफील्ड कॉरिडॉर) चा समावेश आहे. सध्या, ब्राउनफिल्ड आणि ग्रीनफिल्ड कॉरिडॉरमधील विविध ठिकाणच्या 75 वेसाइड सुविधा स्थळे www.etenders.gov.in या लिंक वर बोलीसाठी खुली आहेत. ही स्थळे एकूण आठ राज्यांमध्ये असून, राजस्थानमधील 27, मध्यप्रदेश 18, जम्मू आणि काश्मीर 9 आणि हिमाचल प्रदेशमधील 3 स्थळांचा यात समावेश आहे.

या वेसाइड ॲमिनिटी या सुविधा प्रवाशांसाठी महामार्गावरील प्रवास अधिक सोयीस्कर बनवण्याबरोबरच महामार्गाचा वापर करणाऱ्यांना आराम करण्यासाठी आणि खान-पानासाठी पुरेशा सुविधाही पुरवतील.

National Highway Logistics Management Ltd. (NHLML) – a special purpose vehicle of NHAI, is developing world class Wayside Amenities along the National Highways/Expressways.
Bids are Live, Apply now!
For more details, visit https://t.co/L3SRBLh5UI#NHAI #BuildingANation pic.twitter.com/sMc74x5rbz

— NHAI (@NHAI_Official) February 28, 2023

Various Wayside Amenities Along National Highways


Previous Post

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या विविध समित्यांवर नाशिकचे सात जण

Next Post

सावधान! कृषी अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेत मोठा बदल; NTAने काढले हे आदेश

Next Post
प्रातिनिधीक फोटो

सावधान! कृषी अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेत मोठा बदल; NTAने काढले हे आदेश

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

आज या व्यक्तींनी कुठलाही व्यवहार करु नये; जाणून घ्या, मंगळवार, २१ मार्च २०२३चे राशिभविष्य

March 20, 2023

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – मंगळवार – २१ मार्च २०२३

March 20, 2023

इंडिया दर्पण – हास्य षटकार – युवक आणि युवती

March 20, 2023

ओले खोबरे खावे की सुके? नारळाच्या पाण्याचे आहेत एवढे सारे फायदे; आहारात नक्की समावेश करा

March 20, 2023

शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे; गारपिट नुकसानीचे पंचनामे येत्या दोन दिवसांत अंतिम करणार – मुख्यमंत्री

March 20, 2023
संग्रहित फोटो

अॅड. गुणरत्न सदावर्तेंच्या ठाण्यातील कार्यालयात चोरी; हे सर्व सामान लंपास

March 20, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group