पुणे – सोशल मीडियाचा प्रमुख प्लॅटफॉर्म समजले जाणारे व्हॉट्सअॅप आपल्या आयुष्यातील अविभाज्य भाग झाले आहे. या अॅपच्या माध्यमातून युजर्स ऑडिओ-व्हिडिओ कॉल, डॉक्युमेंट्सही शेअर करू शकतात. कोरोना महामारीमुळे या मेसेजिंग अॅपमध्ये बराच बदल करण्यात आला आहे. वर्क फ्रॉम होममुळे कर्मचारी एकमेकाशी कनेक्ट होत आहेत. तसेच शाळा-कॉलेजचा अभ्यासही व्हॉट्सअॅपवरच होतोय. कंपन्या व्हॉट्सअॅपवरच सूचना देतात. आता व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून पेमेंटसुद्धा करता येते. व्हॉट्सअॅप वापरण्यासाठी इंटरनेट आवश्यक आहे. अनेक वेळा डाटा संपल्यानंतर इंटरनेट वापरता येत नाही. पण विना इंटरनेट व्हॉट्सअॅप चालण्याची आम्ही तुम्हाला एक युक्ती सांगणार आहोत.
चॅटसिम करणार मदत
विना इंटरनेट व्हॉट्सअॅप वापरण्यासाठी तुम्हाला एका विशेष सिम कार्डची खरेदी करावी लागेल. त्या सिमचे ChatSim असे नाव आहे. या सिमच्या माध्यमातून विना इंटरनेट अॅप्स चालवू शकतो. हे सिम ऑनलाइन किंवा ई-कॉमर्स वेबसाइटवर खरेदी केले जाऊ शकते. https://www.chatsim.com/ या चॅटसिमच्या वेबसाइटवरूनही मागवू शकतात.
चॅटसिममध्ये विशेष काय
चॅटसिम साधारणपेक्षा खूपच वेगळे असते. यातून अनेक फायदे मिळतात. चॅटसिम तुम्ही देशात किंवा परदेशात कुठेही वापरू शकतात. हे सिम एक वर्षासाठी वैध राहील. चॅटसिमच्या माध्यमातून अनलिमिटेड मेसेज आणि इमोजी सेंट करू शकतात. चॅटसिम सामान्य सिमच्या तुलनेत महाग असते. ते खरेदी केल्यानंतर एक वर्ष वापरू शकतो. त्याची किंमत १८०० रुपये आहे. त्यानंतर रिचार्ज करून आपण वैधता वाढवू शकतो.