इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – छोट्या पडद्यावरील मालिकांचा विशेषतः झी मराठीवरील मालिकांचा एक विशिष्ट असा प्रेक्षकवर्ग असतो. याचे प्रमुख कारण म्हणजे त्या मालिकांमधील विषय आणि त्याचे दर्जेदार सादरीकरण. यामुळेच झी मराठीवरील मालिकांना प्रेक्षकांची पसंती मिळत असते. आणि म्हणूनच सातत्याने नवनवीन मालिका छोट्या पडद्यावर येत असतात. नवीन मालिका आल्या की जुन्या मालिकांना निरोप देणे ओघाने आलेच. ‘झी मराठी’वरील अशीच एक मालिका आता निरोप घेते आहे. यामुळे चाहते नाराज झाले आहेत. सध्या ही एकच मालिका चांगली सुरू आहे, ती बंद करू नका, अशी विनंती यानिमित्ताने चाहते करत आहेत.
छोट्या पडद्यावरील या मालिकांचा एक ठरावीक प्रेक्षकवर्ग असतो. हे चाहते या मालिकांवर नितांत प्रेम करतात. त्यामुळेच त्यातील भूमिका चाहते समरसून जगतात. यातील भूमिकांवर जेवढं प्रेम करतात, तेवढीच त्यावर टीका करतात, संताप व्यक्त करतात. आताही झी मराठीवरील एक मालिका संपत असल्याने चाहते नाराज आहेत. झी मराठीवर नुकत्याच दोन मालिका सुरू झाल्या असून अजून दोन मालिका लवकरच येऊ घातल्या आहेत. यात ‘तू चाल पुढं’ आणि ‘अप्पी आमची कलेक्टर’ या दोन मालिका सुरू झाल्या आहेत, तर ‘दार उघड बये’ आणि ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या दोन मालिका सुरू होणार आहेत.
संबळ वाजवणाऱ्याच्या मनात 'भक्तिभाव' असेल तर तिथे 'भेदभावाला' जागा नाही.
नवी मालिका 'दार उघड बये'
१९ सप्टेंबरपासून, सोम ते शनि, रात्री. ८. ३० वा. #DarUghadBaye #ZeeMarathi pic.twitter.com/jKyx5GZmYr— Zee Marathi (@zeemarathi) August 31, 2022
एवढ्या चार मालिकांमुळे एक मालिका निरोप घेणार हे नक्की. याच वाहिनीवरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ ही लोकप्रिय मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असून तिच्या जागी ‘दार उघड बये’ ही मालिका येणार आहे. १७ सप्टेंबरला ही मालिका संपणार आहे. मात्र, हे कळल्यावर प्रेक्षकांचा हिरमोड झाला आहे. ही मालिका चांगली सुरू आहे, ती प्लिज बंद करू नका, मस्त मालिका आहे, अशीच चालू ठेवा, अशी विनंती प्रेक्षक करत आहेत.
https://www.instagram.com/p/Ch5Jj9MLqE5/?utm_source=ig_web_copy_link
TV Serial Majhi Tujhi Reshimgath Will end Soon
Zee Marathi Entertainment Dar Ughad Baye