अजय सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
नाशिक जिल्हयाच्या सटाणा तालूक्यातील दरेगाव शिवारातील शेतकरी प्रविण नानाजी पवार यांच्या शेतात रात्रीच्या वेळी शिकारीच्या नादात बिबट्या विहिरीत पडल्याची घटना घडली. ही बाब सकाळी लक्षात येताच वनविभागाला याची माहिती देण्यात आली. त्यानंतर स्थानिकांच्या मदतीने वनविभागाने रेस्कू ऑपरेशन राबवत बिबट्याला बाहेर काढले. सर्व प्रथमच एक खाट विहिरीत सोडण्यात आली. बिबट्या खाटेवर येताच नंतर पिंजरा सोडण्यात येऊन त्याला जेरबंद करण्यात दोन तासाच्या प्रयत्ना नंतर रेस्कू ऑपरेशन यशस्वी झाले.