मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेत आज ४.३० वाजता भारत – दक्षिण आफ्रिका दरम्यान सामना पर्थ स्टेडियमवर रंगणार आहे. अर्धातास पूर्वी नाणेफेक झाल्यानंतर या सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध चॅनेलवर पाहता येणार आहे. भारत ४ गुणांसह गटात आघाडीवर आहे. ही आघाडी कायम ठेवण्यासाठी भारताला विजयाची हॅट्रिक करण्याची संधी आहे. या स्पर्धेत पहिल्याच सामन्यात भारताने पाकिस्तानचा पराभव करत विजय मिळवला आहे. त्यानंतर नेदरलँड्सविरुद्ध ५६ धावांनी विजय मिळवला. तर दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेच्या संघानेही दोन्ही सामने जिंकले आहे. आतापर्यंत आंतरराष्ट्रीय टी – २० सामन्यात भारताने १३ तर दक्षिण आफ्रिकेन ९ विजय मिळवले आहे. टी-20 विश्वचषकापूर्वी भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन सामन्याची टी-20 मालिकाही जिंकली होती.
भारताचा संभाव्य संघ
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंह.
दक्षिण आफ्रिकेचा संभाव्य संघ
क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), टेम्बा बावुमा (कर्णधार), रिली रीसो, एडन मार्कराम, ट्रिस्टन स्टब्स, डेव्हिड मिलर, वेन पारनेल, केशव महाराज, कागिसो रबाडा, अॅनरिक नॉर्खिया, तबरेझ शम्सी/लुंगी एनगिडी/मार्को जॅनसेन.