इंडिया दर्पण वृत्तसेवा
सोमालियाची राजधानी मोगादिशूमध्ये शनिवारी झालेल्या दोन कार बॉम्बस्फोटात १०० जण ठार झाले आहेत. या घटनेत आतापर्यंत ३०० हून अधिक जण जखमी झाले आहे. सोमालियातील शिक्षण मंत्रालयाबाहेर ही घटना घडली. या हल्ला दहशतवादी संघटनेने केला आहे. पण, या हल्ल्याची जबाबदारी आतापर्यंत कोणत्याही दहशतवादी संघटनेने घेतलेली नाही. सोमालियाचे अध्यक्ष हसन शेख महमूद यांनी हा हल्ला भ्याड असल्याचे सांगत अल-शबाबला जबाबदार धरले आहे. याअगोदर पाच वर्षांपूर्वी या ठिकाणी बॉम्बस्फोट झाला होता. त्यात ५०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. आता त्याच ठिकाणी १०० लोकांना आपला जीव गमवावा लागला.