सुरगाणा – आदिवासी बहूल भाग असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उंबरठाण येथे सतीश इंगळे यांच्या इयत्ता पाचवीच्या ‘मिशन नवोदय’ उपक्रमाला उत्कृष्ट यश मिळाले. तीन विद्यार्थ्यांची जवाहर नवोदयसाठी निवड झाली. ‘मिशन नवोदय’ च्या यशस्वी परंपरेमुळे आज पर्यंत ११ विद्यार्थ्यांना जवाहर नवोदय विद्यालयाला प्रवेश मिळाला आहे. कोविड काळात आदिवासी भागात सुविधांचा अभाव असल्यामुळे विद्यार्थ्यांना आॕनलाईन शिक्षण देणे शक्य नव्हते. कोविडच्या सर्व नियमांचे पालन करून उंबरठाण शाळेत ओट्यावरच्या शाळेत, मंदिरातील शाळेत, शक्य असेल त्या विद्यार्थ्यांना व्हॅाट्सॲप व्दारे अभ्यास, शाळा सुरू झाल्यानंतर जादा तासिका घेऊन अभ्यास अशा प्रकारे विद्यार्थ्यांना नवोदय स्पर्धा परिक्षेचे धडे दिले. त्याची फलनिष्पत्ती म्हणजे तीन विद्यार्थ्यांची जवाहर नवोदय विद्यालय खेडगाव साठी निवड झाली आहे. सर्व स्तरातून उंबरठाण शाळेचे कौतुक होत आहे.
नवोदय विद्यालयासाठी निवड झालेले विद्यार्थी.
१) निर्झरा माधव गायकवाड
२) वृषाली राजेंद्र गावित
३) दर्शन जयवंत भोये
नवोदयसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना शिक्षक सतीश इंगळे, गटशिक्षण अधिकारी धनंजय कोळी, उंबरठाण बीट विस्तार अधिकारी डाॕ. नेहा शिरोरे, केंद्रप्रमुख अशोक वाघ, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा मनिषा देशमुख, मुख्याध्यापक लक्ष्मण बागुल, जयराम धूम, पदविधर शिक्षक राजेश भोये, राजेंद्र गावित, शिक्षिका सुमित्रा जाधव, संगिता भोये, योगिता महाले यांचे मार्गदर्शन मिळाले. ग्रामस्थ माधव पवार, सुरेश चौधरी, सिताराम पवार, यशवंत जाधव, मधुकर खोटरे, लक्ष्मण खोटरे, माधव गायकवाड, जयवंत भोये, आदिवासी शिक्षक संघटना, आदिवासी प्राथमिक शिक्षक संघटना यांनी विद्यार्थी व शाळेचे अभिनंदन केले.