अजय सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
मुस्लिम बहुल मालेगाव शहरात भर पावसातही बकरी ईद उत्साहात साजरी करण्यात आली. मालेगावच्या मुख्य ईदगाह मैदानावर भर पावसात मुस्लिम बांधवांनी सामूदायिक नमाज पठण करण्यासाठी गर्दी केली होती. यावेळी मुस्लिम बांधवानी एकमेकांना आलिंगन देत ईदच्या शुभेच्छा दिल्या. तसेच चांगले प्रजन्यवृष्टी व्हावी. देशात, सुख शांती व राष्ट्रीय एकात्मता वाढीस लागावी यासाठी विशेष दुवा करण्यात आली .बकरी ईदला कुर्बाणीला महत्व आहे. इस्लाममध्ये सांगितल्याप्रमाणे मुस्लीम बांधवांनी कुर्बाणी दिली. मुख्य ईदगाह मैदानासह ११ ठिकाणी नमाज पठण करण्यात आले. मालेगावसह मनमाड, सटाणा, कळवण व नांदगाव मध्येही बकरी उत्साहात साजरी करण्यात आली.