अजय सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
मालेगाव शहरात गुन्हेगारीचे प्रकार सातत्याने समोर येत आहेत. आताही एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. त्यात हे स्पष्ट दिसत आहे की, गेल्या बुधवारी रात्री तरुणांचे गँगवॉर झाले आहे. मावस भावाच्या कुटुंबातील वाद सोडविण्यासाठी एक तरुण गेला. मात्र, या तरुणावर धारदार तलवारीने वार करीत टोळक्याने गँगवार केले. या हल्ल्यात तरुणाचा पाय छाटला गेला आहे. या घटनेला दोन दिवसांचा कालावधी उलटला तरी संशयित अद्यापी फरारच आहेत.
या गँगवॉर आणि हल्ल्याचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले आहे. या व्हिडिओतून दिसून येते की, पाच ते सहा जणांच्या टोळक्याने मोहम्मद रशीद या तरुणावर तलवारीने वार केले. या घटनेचा हा सीसीटीव्ही व्हिडिओ सून्न करणारा आहे. दहशत माजवत अशा प्रकारची गुन्हेगारी होत असल्याने एकप्रकारे हे पोलिसांनाच आव्हान देण्यात आले आहे.
मालेगाव शहरातील भर नागरीवस्तीत गँगवारच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. शहरात पोलिसांचा गुन्हेगारांवर वचक राहिलाच नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. सर्वसाधारण नागरिकांना आणि महिलांना अशा घटनांमुळे जीव मुठीत धरून जगावे लागत आहे.
Malegaon Gangwar Youth leg cut CCTV video Police Investigation Crime