India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

केंद्र सरकारला सर्वोच्च न्यायालयाचा मोठा दणका; तो आदेश तत्काळ मागे घेण्याचे आदेश

India Darpan by India Darpan
March 13, 2023
in महत्त्वाच्या बातम्या
0

 

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – केंद्र सरकारला सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा धक्का बसला आहे. न्यायालयाने संरक्षण मंत्रालयाला २० जानेवारीचा आदेश तात्काळ मागे घेण्यास सांगितले आहे, ज्यामध्ये चार हप्त्यांमध्ये वन रँक वन पेन्शन (ओआरओपी) देण्याचे म्हटले होते. न्यायालय म्हणाले की, संरक्षण मंत्रालय कायदा हातात घेऊ शकत नाही. यावर केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाला सांगितले की, त्यांनी माजी सैनिकांची OROP थकबाकी एका हप्त्यात भरली आहे, परंतु पूर्ण भरण्यासाठी आणखी वेळ लागेल.

सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती पी एस नरसिम्हा आणि न्यायमूर्ती जे बी परडीवाला यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणावर सुनावणी झाली. ऍटर्नी जनरल आर वेंकटरामानी न्यायालयाला सांगितले की, केंद्र सरकारने माजी सैनिकांना एकाच हप्त्यात OROP थकबाकी दिली आहे, परंतु पुढील देयकांसाठी आणखी काही कालावधी आवश्यक आहे.

यावर खंडपीठाने वेंकटरामानी यांना सांगितले की, “ओआरओपी थकबाकी भरण्याबाबतची (तुमची) २० जानेवारीची अधिसूचना आधी मागे घ्या, त्यानंतर आम्ही तुमच्या अर्जावर वेळेत विचार करू.” खंडपीठाने म्हटले आहे की, संरक्षण मंत्रालयाचा २० जानेवारीचा आदेश त्याच्या निर्णयाच्या पूर्णपणे विरुद्ध आहे. तसेच, एकतर्फीपणे चार हप्त्यांमध्ये OROP देय देतील.

न्यायालयाने अॅटर्नी जनरलला पेमेंटसाठी थकबाकीचे प्रमाण, पेमेंट प्रक्रियेसाठी स्वीकारल्या जाणार्‍या पद्धती आणि प्राधान्य यावर तपशीलवार माहिती तयार करण्यास सांगितले. खंडपीठ म्हणाले की, “आम्हाला असे वाटते की काही प्रकारचे वर्गीकरण असावे आणि वृद्धांना आधी थकबाकी दिली जावी,”
दरम्यान, हा खटला सुरू झाल्यापासून चार लाखांहून अधिक पेन्शनधारकांचा मृत्यू झाला आहे.

Supreme Court on OROP Defence Ministry 20 January Order


Previous Post

समृद्धी महामार्गावरुन धावणाऱ्या नागपूर-शिर्डी बस सेवेबाबत एसटी महामंडळाने घेतला हा मोठा निर्णय

Next Post

अहमदाबाद कसोटीचा निकाल लागण्यापूर्वीच टीम इंडिया WTC फायनलमध्ये; कसं काय?

Next Post

अहमदाबाद कसोटीचा निकाल लागण्यापूर्वीच टीम इंडिया WTC फायनलमध्ये; कसं काय?

ताज्या बातम्या

इंडिया दर्पण – विचार धन – वाचा आणि नक्की विचार करा

March 22, 2023

अभिनेता दीपक तिजोरीची तब्बल अडीच कोटींची फसवणूक; गुन्हा दाखल

March 22, 2023

ट्रोल झाल्यानंतर अखेर अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने मागितली माफी

March 22, 2023

‘आता बोलायची वेळ आली आहे’, भाजप नेत्या पंकज मुंडे यांचा इशारा; पण कुणाला?

March 22, 2023

ऑटोरिक्षा चालक-मालक यांच्या अडीअडचणी सोडविण्याबाबत सरकार म्हणाले…

March 22, 2023

राज्याच्या अर्थसंकल्पात पुण्याला नेमकं काय मिळालं?

March 22, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group