बुधवार, सप्टेंबर 17, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

यशोगाथा! अनुभवाशिवाय तब्बल ८०० क्विंटल द्राक्ष उत्पादन करणाऱ्या मातोरीच्या संगीता पिंगळे

by Gautam Sancheti
ऑक्टोबर 16, 2021 | 5:06 am
in संमिश्र वार्ता
0
IMG 20211007 220127 961

अनुभवाशिवाय
तब्बल ८०० क्विंटल द्राक्ष उत्पादन करणाऱ्या
मातोरीच्या संगीता पिंगळे

“शेती बोलणं खूप सोपं असतं…करून दाखव!” हे ऐकल्यावर शेतीतील कुठलाही अनुभव नसताना आज पूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह ह्याच शेतीवर करून दाखविणाऱ्या नवदुर्गेचा खडतर प्रवास जाणून घेऊया – संगीता पिंगळे – मातोरी (नाशिक)

मातोरी येथील संगीता पिंगळे ह्या आज एक प्रगतीशील महिला शेतकरी जरी असल्या तरी लहानपणापासून त्यांनी काही वेगळी स्वप्नं बघितली होती. शिक्षण चालू असताना पुढे स्पर्धापरीक्षा देऊन अधिकारी व्हायच ठरवलेल्या संगीताताईंनी बीएससी ला प्रवेश घेतला. पण डिग्री पूर्ण होताच घरच्यांनी ताईंच्या लग्नाचा निर्णय घेतल्याने पुढील स्वप्ने पूर्ण होऊ शकली नाही. २००० साली ताईंचा मातोरी येथील अनिल पिंगळे यांच्याशी विवाह झाला. यानंतर त्यांच्या जीवनाच्या खडतर प्रवासाला सुरुवात झाली. सासरी कुटुंबाचा मुख्य उत्पन्नाचा स्रोत हा शेतीवरच अवलंबून होता.

पती अनिल हे देखील शेतकरीच होते. ताईंना शेतीकामात त्यापूर्वी कुठलाही अनुभव नव्हता आणि लग्नानंतर देखील शेतीकाम न करता त्या घरची कामे पाहत त्यामुळे शेतीशी कधी संबंध आला नाही. हे सर्व करत असताना कुटुंबाची जबाबदारी तर त्या व्यवस्थितपणे सांभाळत होत्याच पण आपण घेतलेल्या शिक्षणाच्या आधारावर आपली एक ओळख निर्माण होऊ शकली नाही हि खंत मनाला त्रास देत होती. यानंतर कधी कल्पनाही केली नसेल अशा घटना आयुष्यात घडू लागल्या. कारण २००१ मध्ये पहिली मुलगी झाली आणि त्याच काळात ताईंच्या वडिलांचे निधन झाले.

२००४ मध्ये दुसरा मुलगा झाला पण हे बाळ अपंग जन्माला आले. आणि दुर्दैवाने केवळ ५ दिवस जगू शकले. पुढचा काळ हा जास्त धक्का देणारा होता कारण २००७ मध्ये ताईंना नववा महिना चालू असतानाच पती अनिल पिंगळे ह्यांचे अपघाती निधन झाले आणि आपला एक मोठा आधार त्यांनी गमावला. या घटनेतून बाहेर येणे ताईंसाठी खूप कठीण झाले होते. त्यानंतर घरात सासू सासरे, दीर, एक जाऊ आणि मूलं हे सर्व होते. २०१७ मध्ये कुटुंब विभक्त झाले, यानंतर ताई, त्यांची एक मुलगी, एक मुलगा व सासू, सासरे हे सोबत राहू लागले.

यापुढील काळ हा खरा परीक्षेचा काळ होता. ताईंच्या वाट्याला १३ एकर शेतीक्षेत्र आलेले होते. सासरे असल्यामुळे शेती चालू होती पण वेगळं झाल्यानंतर तीन महिन्यात ससार्‍यांचे निधन झाले. आता घराचा मुख्य आधार असलेली शेतीची जबाबदारी सर्व ताईंना सांभाळायची होती. शेतीमध्ये कधीही अनुभव नसला तरी सर्व बळ एकवटून हि शेती करण्याचा निर्णय ताईंनी घेतला. पण या काळात एक महिला सर्व शेती सांभाळणार ही भावनाच अनेकांच्या पचनी पडत नव्हती आणि घरातदेखील यापूर्वी कोणी महिला शेतीत काम पाहत नव्हती. त्यामुळे अनेकांकडून बोलणे ऐकावे लागले.

“शेती बोलणं खूप सोपं असतं.. करून दाखव!” असं एक व्यक्ती ताईंना बोलल्यावर मग शेती करण्याची जिद्द आणखी वाढली. आणि आपले एक अस्तित्व आपण या शेतीतूनच निर्माण करू शकतो या विचाराने त्यांनी पुढे पाऊले टाकली. आता हाती काही नसताना शून्यातून हि सर्व सुरुवात करायची होती. पहिल्या वर्षी शेतीतील काहीही माहिती नव्हती तसेच द्राक्षबागेतून उत्पन्न काढायचे तर भांडवल गरजेचे होते. ह्या दोनही गोष्टींसाठी त्या काळात भावांची मोठी मदत झाली, त्यांच्याकडूनच शेतीविषयक सर्व तांत्रिक गोष्टी त्या शिकत गेल्या.

या काळात थोडी चिंता वाटत होती कारण द्राक्षशेतीचा अनुभव नव्हताच आणि ‘डाउणी, जळकुटी तसेच गारपीट अश्या कारणांनी द्राक्षबाग अयशस्वी होतात’ यासारख्या अनेक गोष्टी यापूर्वी ऐकल्या होत्या. ह्या शेतीमधील एक सर्वात मोठी अडचण होती ती म्हणजे जमीन हि पाणथळ होती. अश्या प्रकारच्या जमिनीत पावसाळ्यात पूर्णपणे पाणी साचून मोठ्या अडचणी येत. अश्या काळात ह्या जमिनीत चालणे सुद्धा अवघड होत असल्याने स्वतः नळीचा वापर करून पावडर मारायला लागत. शेती तर करायची होतीच पण घर देखील चालवायचे होते, यामध्ये शेतीसाठी लागणारी औषधे, घरी लागणारा किराणा तसेच इतर अनेक गोष्टींसाठी धावपळ करायला घरी कोणी इतर व्यक्तीदेखील नव्हती. मग त्या वेळी स्वतःचे दागिने गहाण ठेऊन एक टू-व्हिलर घेऊन ह्या सर्व कामांसाठी ताई स्वतःच बाहेर पडू लागल्या. पावडर, औषधांच्या दुकानात महिलेला बघून लोकांना थोडं वेगळं वाटायचं पण हळूहळू हाच दृष्टिकोनदेखील बदलत गेला. या सगळ्यात सासूबाईंचा एक मानसिक भक्कम आधार पाठीशी होता.

ह्या सगळ्या संकटाना हिमतीने तोंड देत २०१७ साली द्राक्षशेतीतूनच चांगले उत्पन्न काढले. आणि या पहिल्याच वर्षात ज्यांच्याकडून आर्थिक मदत घेतली होती त्यांना त्यांचे पैसे परत केले. द्राक्षात ७०० ते ८०० क्विंटल उत्पादन आज त्या काढत आहे. यात द्राक्षासोबतच टोमॅटो, सोयाबीनची देखील लागवड केली आहे. याच शेतीत जिद्दीने काम करत कुठल्या संकटाची झळ कुटुंबावर पडू दिली नाही सोबतच आज मुलांची शिक्षण देखील सुरळीत चालू आहेत. “मी शेती करूशकत नाही, हा लोकांचा विचार मला खोडून काढायचा होता” हे आपलं विधान यशस्वीरीत्या खरं करून दाखविणाऱ्या संगीताताईच्या हिमतीला सलाम!

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

सध्याच्या सणासुदीत घर खरेदी कराच; मिळतील एवढे सर्व फायदे

Next Post

इंडिया दर्पण – हास्य षटकार – भाव

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

GwyqMwabYAA1fOl e1757399728553
महत्त्वाच्या बातम्या

पाकिस्तान क्रिकेट संघाने थेट आशिया कपमधून बाहेर पडण्याचा घेतला निर्णय

सप्टेंबर 17, 2025
Untitled 23
स्थानिक बातम्या

नाशिकमध्ये महाराष्ट्र चेंबरतर्फे शनिवारी शासकीय योजना आणि व्यवसायाच्या संधी विषयावर सेमिनार…

सप्टेंबर 17, 2025
mukt
संमिश्र वार्ता

महाज्ञानदीप’ पोर्टलवर भारतीय ज्ञान प्रणालीवर आधारित पहिला ऑनलाइन अभ्यासक्रम सुरू

सप्टेंबर 17, 2025
crime 88
क्राईम डायरी

दुमजली माडीचे कौले काढून चोरट्यांनी घरातील रोकड व सोन्याच्या दागिण्यांवर मारला डल्ला

सप्टेंबर 17, 2025
accident 11
क्राईम डायरी

गाय आडवी गेल्याने दुचाकीवरून दांम्पत्य पडले…६९ वर्षीय महिलेचा मृत्यू

सप्टेंबर 17, 2025
crime114
क्राईम डायरी

कर्जदारास बंदुकीचा धाक दाखवून सावकाराने केले अपहरण…व्याजासह मुद्दल परत करुनही घडला प्रकार

सप्टेंबर 17, 2025
Raj Thackeray1 2 e1752502460884
संमिश्र वार्ता

राज ठाकरे यांनी अमित शाह, जय शाह यांचे प्रतिकात्मक व्यंगचित्र काढून केला हल्लाबोल…

सप्टेंबर 17, 2025
e vidhya 1024x275 1 e1758078658915
संमिश्र वार्ता

महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी नवे ज्ञानविश्व…तब्बल २०० शैक्षणिक टीव्ही वाहिन्या

सप्टेंबर 17, 2025
Next Post
प्रातिनिधीक फोटो

इंडिया दर्पण - हास्य षटकार - भाव

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011