India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर; या तारखेपासून सुरू होणार

India Darpan by India Darpan
December 30, 2022
in महत्त्वाच्या बातम्या
0
प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो


 

पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – केंद्रीय माध्यमिक शिक्षा मंडळ (सीबीएसई)ने इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केल्यानंतर आता राज्य माध्यमिक शिक्षण व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानेही इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. त्यामुळे आता विद्यार्थी, पालक व शिक्षकांना त्यासंदर्भातील नियोजन करता येणार आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नऊ विभागीय मंडळामार्फत इयत्ता बारावी आणि इयत्ता दहावीच्या परीक्षा घेण्यात येतात. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, इयत्ता बारावीची लेखी परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. ही परीक्षा २१ मार्च पर्यंत असणार आहे. तर, इयत्ता दहावीची लेखी परीक्षा २ मार्चपासून सुरू होणार आहे. ही परीक्षा २५ मार्चपर्यंत चालणार आहे.

इयत्ता दहावी आणि इयत्ता बारावीच्या लेखी परीक्षांची संभाव्य वेळापत्रके मंडळाने त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर सप्टेंबरमध्येच  उपलब्ध करून दिले होते. या वेळापत्रकांबाबत मंडळाने विविध सूचना आणि हरकती मागविल्या होत्या. त्याची दखल घेत आता मंडळाने लेखी परीक्षांच्या अंतिम तारखा जाहीर केल्या आहेत.

इयत्ता दहावी आणि बारावी परीक्षेचे विस्तृत वेळापत्रक बघण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे
https://www.mahahsscboard.in/

#महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या #दहावी आणि #बारावी परीक्षेच्या तारखा जाहीर

बारावीची लेखी परीक्षा येत्या २१ फेब्रुवारी ते २१ मार्च या काळात

दहावीची परीक्षा २ मार्च ते २५ मार्च दरम्यान होणार @DDNewslive @DDNewsHindi pic.twitter.com/UlBWyWW2mZ

— DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या (@ddsahyadrinews) December 30, 2022

SSC and HSC Exam Schedule Declared Today
State Board Education School Dates


Previous Post

विधिमंडळ अधिवेशन आटोपताच राज्य सरकारने केल्या या IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या

Next Post

तब्बल बाराशे वर्षांनंतरही आदिवासी भागात अंधश्रद्धा निर्मूलन का झाले नाही? नेमका दोष कुणाचा? ही आहेत कारणे…

Next Post

तब्बल बाराशे वर्षांनंतरही आदिवासी भागात अंधश्रद्धा निर्मूलन का झाले नाही? नेमका दोष कुणाचा? ही आहेत कारणे...

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

आज या व्यक्तींनी कुठलाही व्यवहार करु नये; जाणून घ्या, मंगळवार, २१ मार्च २०२३चे राशिभविष्य

March 20, 2023

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – मंगळवार – २१ मार्च २०२३

March 20, 2023

इंडिया दर्पण – हास्य षटकार – युवक आणि युवती

March 20, 2023

ओले खोबरे खावे की सुके? नारळाच्या पाण्याचे आहेत एवढे सारे फायदे; आहारात नक्की समावेश करा

March 20, 2023

शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे; गारपिट नुकसानीचे पंचनामे येत्या दोन दिवसांत अंतिम करणार – मुख्यमंत्री

March 20, 2023
संग्रहित फोटो

अॅड. गुणरत्न सदावर्तेंच्या ठाण्यातील कार्यालयात चोरी; हे सर्व सामान लंपास

March 20, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group