नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन आज संपुष्टात आले. हे अधिवेशन होताच राज्य सरकारने राज्यातील सहा सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले आहेत. या अधिवेशन काळातच बदल्यांचे आदेश काढले जातील, असे सांगितले जात होते. मात्र, अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सरकारने हे आदेश काढले आहेत.
बदली झालेले अधिकारी असे
१) राजेश पाटील – (IAS २००५) – संचालक, सैनिक कल्याण, पुणे यांना सहव्यवस्थापकीय संचालक, सिडको, नवी मुंबई या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
२्) अश्विन ए. मुद्गल (IAS २००७) – सह व्यवस्थापकीय संचालक, सिडको, नवी मुंबई यांच्याकडे महानगर आयुक्त, एमएमआरडीए, मुंबई ही जबाबदारी देण्यात आली आहे.
३) अजय अण्णासाहेब गुल्हाने (IAS २०१०) – यांची नागपूर स्मार्ट सिटी, सीईओ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचबरोबर त्यांच्याकडे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त, नागपूर महानगरपालिका हा सुद्धा अतिरिक्त कार्यभार असणार आहे.
४) दीपक सिंगला (IAS २०१२) – यांची अतिरिक्त आयुक्त, PMRDA, पुणे म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
५) भाग्यश्री बानायत (IAS २०१२)- यांना नाशिक महानगरपालिका, नाशिक येथे अतिरिक्त महापालिका आयुक्त म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.
६) डॉ. इंदुरानी जाखड (IAS २०१६) – यांची MAVIM, मुंबई च्या व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
Maharashtra Government Order IAS Officers Transfer