पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – केंद्रीय माध्यमिक शिक्षा मंडळ (सीबीएसई)ने इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केल्यानंतर आता राज्य माध्यमिक शिक्षण व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानेही इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. त्यामुळे आता विद्यार्थी, पालक व शिक्षकांना त्यासंदर्भातील नियोजन करता येणार आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नऊ विभागीय मंडळामार्फत इयत्ता बारावी आणि इयत्ता दहावीच्या परीक्षा घेण्यात येतात. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, इयत्ता बारावीची लेखी परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. ही परीक्षा २१ मार्च पर्यंत असणार आहे. तर, इयत्ता दहावीची लेखी परीक्षा २ मार्चपासून सुरू होणार आहे. ही परीक्षा २५ मार्चपर्यंत चालणार आहे.
इयत्ता दहावी आणि इयत्ता बारावीच्या लेखी परीक्षांची संभाव्य वेळापत्रके मंडळाने त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर सप्टेंबरमध्येच उपलब्ध करून दिले होते. या वेळापत्रकांबाबत मंडळाने विविध सूचना आणि हरकती मागविल्या होत्या. त्याची दखल घेत आता मंडळाने लेखी परीक्षांच्या अंतिम तारखा जाहीर केल्या आहेत.
इयत्ता दहावी आणि बारावी परीक्षेचे विस्तृत वेळापत्रक बघण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे
https://www.mahahsscboard.in/
https://twitter.com/ddsahyadrinews/status/1608818615058591747?s=20&t=13eTNnJUHMd3IuwgRpJ7Nw
SSC and HSC Exam Schedule Declared Today
State Board Education School Dates