नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिकपासून जवळच असलेल्या एसमबीटी या मेडिकल कॉलेजमधील १०० हून अधिक विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाली आहे. यातील सुमारे ५५ विद्यार्थी अद्यापही रुग्णालयात उपारार्थ दाखल आहेत. तर इतरांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे.
इगतपुरी तालुक्यातील धामणगाव येथील एसएमबीटी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अँड रिसर्च सेंटरमधील १००हून अधिक विद्यार्थ्यांना मळमळ आणि पोटदुखीचा त्रास झाला. विद्यार्थ्यांनी तक्रार केली. त्यानंतर या सर्वांनी रुग्णालयात उपचार घेतले. कॉलेज कॅम्पसमध्ये असलेल्या कॅन्टीनमध्ये जेवण घेतल्यानंतर सुमारे १०० ते १२५ विद्यार्थ्यांना त्रास झाल. त्यानंतर त्यांना कॅम्पसमधील एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. बहुतेकांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. जवळपास ५० ते ५५ विद्यार्थी अद्यापही निरीक्षणाखाली रुग्णालयात आहेत,” एसएमबीटी चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने तसे सांगण्यात आले आहे.
कॅन्टीनच्या कामकाजाचे कंत्राट एका खासगी कंपनीला देण्यात आले आहे, असे पोलिसांनी सांगितले. वाडीवऱ्हे पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्याने अन्नातून विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या ८९ सांगितली आहे. तसेच, या घटनेची वैद्यकीय-कायदेशीर केस (MLC) म्हणून चौकशी केली जात आहे, असेही पोलिसांनी सांगितले आहे.
SMBT Medical College Student Food Poisoning
Nashik Education Dhamangaon