बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

क्रिकेटपटू ऋषभ पंतच्या कारचा भीषण अपघात; आलिशान कार अक्षरशः जळून खाक, पंत गंभीर जखमी

by India Darpan
डिसेंबर 30, 2022 | 9:56 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
FlMhOICaEAE788j e1672374188735

 

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर ऋषभ पंत रस्ता अपघाताचा बळी ठरला आहे. रुरकी येथे त्यांची कार दुभाजकाला धडकली. या अपघातात पंतच्या डोक्याला आणि पायाला दुखापत झाली आहे. अपघातानंतर कारने पेट घेतला आणि कार पूर्णपणे जळून खाक झाली. कारची काच फोडून पंत यांना बाहेर काढून रुग्णालयात नेण्यात आले. त्याची प्लास्टिक सर्जरी होणार आहे. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना दिल्लीला रेफर केले आहे. पंत दिल्लीहून उत्तराखंडमधील आपल्या घरी परतत होते.

रुरकीच्या नरसन सीमेवर हम्मादपूर झालजवळ त्यांच्या कारला अपघात झाला. पंतच्या डोक्याला आणि पायाला दुखापत झाली आहे. त्याच्या पाठीलाही खूप दुखापत झाली आहे. मात्र त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांना दिल्लीला रेफर करण्यात आले आहे. ऋषभ पंतची कार रेलिंगला धडकली. त्यानंतर कारने पेट घेतला आणि पंत यांना मोठ्या मुश्किलीने कारमधून बाहेर काढण्यात आले. त्यांना दिल्ली रोडवरील सक्षम रुग्णालयात दाखल करण्यात आले. जिथे प्राथमिक उपचारानंतर त्यांना दिल्लीला रेफर करण्यात आले आहे. सक्षम हॉस्पिटलचे डॉक्टर सुशील नागर यांनी सांगितले की, ऋषभ पंतचा पाय फ्रॅक्चर झाला असून त्याच्या कपाळावरही जखम आहे. कपाळावर काही टाके घालण्यात आले आहेत.

https://twitter.com/tweet_sandeep/status/1608671614018916352?s=20&t=13eTNnJUHMd3IuwgRpJ7Nw

ऋषभ पंत ज्या मर्सिडीज कारमध्ये घरी परतत होता, त्या गाडीची नंबर प्लेट DL 10 CN 1717 आहे. अपघातानंतर पंत यांच्या गाडीतून काही पैसेही पडले, जे स्थानिक लोकांनी उचलले. अलीकडेच बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेत ऋषभ पंतने अप्रतिम फलंदाजी केली. दुसऱ्या कसोटीत त्याचे शतक हुकले, पण त्याच्या उत्कृष्ट फलंदाजीच्या जोरावर त्याने या सामन्यात भारताला आघाडी मिळाली होती. त्यामुळेच दुसऱ्या डावात महत्त्वाचे फलंदाज अपयशी ठरल्यानंतरही टीम इंडियाने सामना जिंकला. मात्र, नुकतेच एकदिवसीय आणि टी-२० मधील खराब कामगिरीमुळे त्याला संघातून वगळण्यात आले होते.

Rishabh Pant's car met with an accident in Roorkee. He is out of danger & getting treatment in Delhi.

Wishing him a speedy recovery. pic.twitter.com/b562zqvX6O

— CricTracker (@Cricketracker) December 30, 2022

Cricketer Rishabh Pant Car Major Accident Injured Fired
Luxurious Mercedes Indian Cricket Team New Delhi Road

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मातोश्री हिराबेन यांचे निधन; मोदींनी दिली अतिशय भावूक प्रतिक्रीया

Next Post

SMBT मेडिकल कॉलेजच्या १००हून अधिक विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा; ५५ जण अजूनही रुग्णालयात दाखल

India Darpan

Next Post
smbt hospital

SMBT मेडिकल कॉलेजच्या १००हून अधिक विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा; ५५ जण अजूनही रुग्णालयात दाखल

ताज्या बातम्या

Untitled 1

भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड होताच रवींद्र चव्हाण यांनी केली ही घोषणा

जुलै 2, 2025
WhatsAppImage2025 07 01at3.42.34PMF0DQ

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेलवन ॲपचे केले उद्घाटन…प्रवाशांना मिळणार या सुविधा

जुलै 2, 2025
note press

नाशिक करन्सी नोट प्रेसच्या भरती परीक्षेत डमी उमेदवार, सात जणांविरुध्द गुन्हा दाखल….बनावट कागदपत्रांच्या आधारे मिळवली नोकरी

जुलै 2, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी तब्येतीची काळजी घ्यावी, जाणून घ्या, बुधवार, २ जुलैचे राशिभविष्य

जुलै 1, 2025
Untitled 2

काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश….

जुलै 1, 2025
Untitled 1

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण….मुंबईत घोषणा

जुलै 1, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011