India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मातोश्री हिराबेन यांचे निधन; मोदींनी दिली अतिशय भावूक प्रतिक्रीया

India Darpan by India Darpan
December 30, 2022
in मुख्य बातमी
0

 

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन मोदी यांचे आज, शुक्रवारी पहाटे निधन झाले. त्यांचे वय १०० होते. आईच्या निधनावर पंतप्रधानांनी भावनिक ट्विट केले. आईचे निधन म्हणजे एका गौरवशाली शतकातील देवाच्या चरणी थांबणे असे त्यांनी म्हटले आहे.

गेल्या जून महिन्यातच हिराबेन यांनी वयाची शंभरी पूर्ण केली होती. गुजरात निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मोदी यांनी हिराबेन यांची भेट घेतली होती. गेल्या काही दिवसांपूर्वी हिराबेन यांची प्रकृती बिघडली. श्वसनाचा त्रास होत असल्याने त्यांना तातडीने अहमदबादच्या युएन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू होते. पंतप्रधान मोदी यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन आईची भेट घेतली. हिराबेन यांची प्रकृती सुधारत असल्याचे सांगण्यात आले. मात्र, रात्रीच्या सुमारास त्यांची तब्ब्येत आणखी खालावली. अखेर आज पहाटेच्या सुमारास त्यांचे निधन झाले.

आईच्या निधनानंतर मोदी यांनी एका ट्विटमध्ये लिहिले की, एक गौरवशाली शतक देवाच्या चरणी विसावले… आईमध्ये, मला ते त्रिमूर्ती नेहमीच जाणवते, ज्यामध्ये एका तपस्वीचा प्रवास, निस्वार्थी कर्मयोगी आणि मूल्यांसाठी वचनबद्ध जीवनाचा समावेश होतो. त्यांनी पुढे लिहिले की, जेव्हा मी त्यांना तिला १०० व्या वाढदिवशी भेटलो तेव्हा तिने एक गोष्ट सांगितली होती, जी नेहमी लक्षात राहते की बुद्धीने काम करा आणि जीवन शुद्धतेने जगा.

शानदार शताब्दी का ईश्वर चरणों में विराम… मां में मैंने हमेशा उस त्रिमूर्ति की अनुभूति की है, जिसमें एक तपस्वी की यात्रा, निष्काम कर्मयोगी का प्रतीक और मूल्यों के प्रति प्रतिबद्ध जीवन समाहित रहा है। pic.twitter.com/yE5xwRogJi

— Narendra Modi (@narendramodi) December 30, 2022

देशात शोककळा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन यांच्या निधनानंतर संपूर्ण देशात शोककळा पसरली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा, बसपा सुप्रीमो मायावती यांच्यासह अनेकांनी हिराबेन यांना श्रद्धांजली वाहिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हीराबेन यांची प्रकृती बुधवारी खालावली, त्यानंतर त्यांना अहमदाबादमधील यूएन मेहता रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर पंतप्रधान मोदी आईला भेटण्यासाठी रुग्णालयात पोहोचले होते. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले पण त्यांना यश आले नाही.

PM Narendra Modi Mother Hiraben Death at 100


Previous Post

या जिल्ह्यात चक्क शिक्षकांच्या मान्यतेचे निघाले बनावट आदेश; शिक्षण मंत्री म्हणाले…

Next Post

इंडिया दर्पण – विचार धन – वाचा आणि नक्की विचार करा

Next Post

इंडिया दर्पण - विचार धन - वाचा आणि नक्की विचार करा

ताज्या बातम्या

मोदी सरकारचा मास्टरस्ट्रोक; केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी केली ही मोठी घोषणा

March 24, 2023
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी आज खर्चाची तयारी ठेवावी; जाणून घ्या, शनिवार, २५ मार्च २०२३चे राशिभविष्य

March 24, 2023

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – शनिवार – २५ मार्च २०२३

March 24, 2023

इंडिया दर्पण – हास्य षटकार – १ कोटीची लॉटरी

March 24, 2023

आदिवासी तरुणांना संधी का मिळत नाही? सरकारी योजना त्यांच्यापर्यंत पोहचतात का? खरं आणि जळजळीत वास्तव हे आहे…

March 24, 2023

कोल्हापूरमध्ये येणार हा मोठा प्रकल्प… ८ हजार कोटींची गुंतवणूक… ५ हजार जणांना रोजगार

March 24, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group