India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

सिन्नर – पुणे महामार्गावरील युवकाच्या खूनाचा उलगडा; आरोपी पोलिसांच्या ताब्यात

India Darpan by India Darpan
February 3, 2023
in स्थानिक बातम्या
0

 

सिन्नर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तालुक्यातील गोंदे येथील ३२ वर्षीय ट्रकचालक युवकाच्या खूनाचा उलगडा झाला आहे. बुधवारी रात्री आठ वाजेच्या ही घटना उघडकीस आली होती. त्यानंतर पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर या खूनातील आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. संपत रामनाथ तांबे (३२) रा. गोंदे ता. सिन्नर असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. पुणे – महामार्गावरील धोंडवीर नगर येथील शिवारात अन्नपूर्णा हॉटेलजवळ युवकाचा मृतदेह आढळून आला. घटनास्थळी मयत युवकाची दुचाकी व छोटीसी तलवार आढळून आली होती. याप्रकरणी मयत संपत तांबे यांचा भाऊ गणपत रामनाथ तांबे याने सिन्नर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींच्या विरोधात खूनाची फिर्याद दिली. सिन्नर पोलिसांनी अज्ञात आरोपींच्या विरोधात खूनाचा गुन्हा दाखल केला.

या घटनेचे घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. शहाजी उमाप यांचे मार्गदर्शन व सुचनांप्रमाणे अपर पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण श्रीमती माधुरी केदार-कांगणे, उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील व सिन्नर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. संतोष मुटकूळे यांनी घटनास्थळी धाव घेवून घटनास्थळाची पाहणी केली. यातील मयत इसम संपत रामनाथ तांबे यांचेबाबत सविस्तर माहीती घेतली असता, तो धोंडवीरनगर शिवार, सिन्नर येथे आयशर वाहनावर बदली ड्रायव्हर म्हणून काम करीत असल्याची माहिती मिळाली. त्याचा पुर्वेतिहास तपासला असता, त्याचेवर गतवर्षी वावी पोलीस ठाणेस इसम नामे चांगदेव सुखदेव तांबे, वय ४५, रा. गोंदे, ता. सिन्नर यांचे अपहरण केल्याचा गुन्हा दाखल असल्याची माहीती प्राप्त झाली.

असा झाला खूनाचा उलगडा
यातील अपहृत इसमाचा मुलगा प्रविण चांगदेव तांबे व मयत संपत तांबे यांचे वडीलांचे अपहरण केल्याच्या कारणावरून जुना वाद होता. त्यामुळे प्रविण तांबे याचेवरील पोलीसांचा संशय बळावला. अधिक माहीती घेतली असता, प्रविण हा तळेगाव दाभाडे, पुणे येथे कामास असल्याची व घटनेच्या दिवशी तो गोंदे, ता. सिन्नर परिसरात असल्याची माहीती मिळाली. संशयीताचा शोध घेण्यासाठी वेगवेगळी पोलीस पथके तयार करून रवाना करण्यात आली. त्यातील पुणे येथे तपासकामी गेलेल्या पोलीस पथकास संशयीत प्रविण चांगदेव तांबे, वय २२, धंदा नोकरी, रा. गोंदे, ता. सिन्नर, जि. नाशिक, हल्ली रा. तळेगाव दाभाडे, जि. पुणे हा मिळून आला. त्यास विश्वासात घेवून विचारपूस केली असता, यातील मयत संपत तांबे याने आरोपी प्रविण तांबे यांचे वडीलांचे अपहरण केल्याचा राग मनात धरून त्याने १ फेब्रुवारी रोजी सायंकाळचे सुमारास नाशिक पुणे महामार्गाने गोंदे ते सिन्नर जाणारे रोडवर मोटर सायकलने त्याचा पाठलाग केला व त्यास अन्नपूर्णा हॉटेलजवळ एकटा गाठून त्याचेकडील धारदार तलवारीने संपत याचे मानेवर, पोटावर, हातावर गंभीर वार करून जीवे ठार मारले असल्याबाबत कबूली दिली. यातील आरोपीस सिन्नर पोलीस ठाणेस हजर करण्यात आले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक संतोष मुटकूळे हे करत आहेत.

तपास पथकास १५ हजार रुपयाचे बक्षीस

नाशिक ग्रामीण जिल्हयाचे पोलीस अधीक्षक शहाजी उमाप, अपर पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण श्रीमती माधुरी केदार कांगणे, उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले यांनी वरील खूनाचा गुन्हा उघडकीस आणणेसाठी केलेले मार्गदर्शन व सुचनांप्रमाणे स्थागुशाचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, सपोजि सागर शिंपी, पोवा नवनाथ सानप, पोना प्रितम लोखंडे, विश्वनाथ काकड, सागर काकड, किरण काकड, हेमंत गिलबिले, प्रदिप बहिरम, वापोना भुषण रानडे, तसेच सिन्नर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. संतोष मुटकूळे, पोगा चेतन मोरे, शहाजी शिंदे, पंकज देवकाते, समाधान बोराडे, कृष्णा कोकाटे, अंकुश दराडे, गौरव सानप यांनी आरोपीस ताब्यात घेवून वरील खूनाचा गुन्हा उघडकीस आणला. पोलीसांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेवून पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांनी तपास पथकास १५ हजार रुपये बक्षीस जाहीर करून सर्वांचे अभिनंदन केले आहे.


Previous Post

‘इंडिया दर्पण’मध्ये उलगडणार आता गोदाकाठचे वैभव; इतिहास अभ्यासक देवांग जानी देणार खरीखुरी माहिती

Next Post

कोसळत्या शेअर्समुळे अदानी स्टॉक एक्स्चेंजच्या रडारवर! NSEने घेतला हा मोठा निर्णय

Next Post

कोसळत्या शेअर्समुळे अदानी स्टॉक एक्स्चेंजच्या रडारवर! NSEने घेतला हा मोठा निर्णय

ताज्या बातम्या

नरेंद्राचार्यजी महाराज संस्थानाच्यावतीने नाशकात स्वागत यात्रा, मिरवणूक

March 22, 2023

राजधानीत गुढीपाडवा साजरा; सिन्नर तालुक्यातील बाल वारकऱ्यांच्या अभंगातून सारेच थक्क

March 22, 2023

हज यात्रेच्या नावाखाली आर्थिक फसवणूक; चार जणांविरूध्द गुन्हा दाखल

March 22, 2023

नंदुरबार जिल्ह्यात शेतपिकांची पाहणी केल्यानंतर कृषीमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले…

March 22, 2023

या अनोख्या एटीममधून मिळते कापडी पिशवी; विटा नगरपरिषदेचा अनोखा उपक्रम

March 22, 2023
प्रातिनिधिक फोटो

सावरकरनगरचे न्यू टकले ज्वेलर्स शोरूम फोडले; २६ लाखाचे अलंकार लंपास

March 22, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group