इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – वैविध्यपूर्ण आणि नवनवीन माहितीचा खजिना वाचकांपुढे सादर करणाऱ्या इंडिया दर्पणमध्ये आता नवी विशेष लेखमाला सुरू होत आहे. दक्षिण गंगा अशी ओळख असलेल्या गोदावरी नदीच्या काठावर असलेल्या नाशिक शहर परिसरात असंख्य ऐतिहासिक ठिकाणे आहेत. खासकरुन गोदाकाठी प्रचंड मोठे वैभव आहे. मात्र, या वैभवाची फारशी माहिती अनेकांना नाही. त्यामुळे गोदाकाठचे हे वैभव आता इतिहास अभ्यासक आणि गोदाप्रेमी सेवा समितीचे अध्यक्ष देवांग जानी हे उलगडणार आहेत.
गोदाकाठचे वैभव हे नवे सदर प्रत्येक आठवड्याला वाचकांच्या भेटीला येणार आहे. यानिमित्ताने गोदाकाठ आणि परिसरातील अनेकविध ठिकाणे आणि वास्तूंचा खराखुरा इतिहास सर्वांसमोर येणार आहे. प्राचीन ग्रंथ, पुस्तके, हस्तलिखिते आणि विविध ठिकाणी नोंद झालेल्या या वास्तू व ठिकाणांची माहिती आता वाचकांना मिळणार आहे. रामकुंड परिसर आणि गोदाकाठ येथील असंख्य ठिकाणांची खरीखुरी माहिती या सदरामध्ये वाचकांना मिळेल.

अध्यक्ष, गोदाप्रेमी सेवा समिती
मो. 9850222100
श्री देवांग जानी हे गोदाप्रेमी सेवा समितीचे अध्यक्ष आहेत. ते वाणिज्य पदवीधर आहेत. ते जलदूत पुरस्कारार्थी आहेत. पाणीदार माणूस पुरस्कारार्थी म्हणून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. बेटर इंडिया पुरस्कारार्थी ते आहेत. इ.स. १७००च्या आसपास नाशिक मध्ये वास्तव्यास असणाऱ्यां अहिल्यादेवी होळकर, गोपिकाबाई व इतर महान व्यक्तींच्या योगदानातून श्री गोदावरी नदी पात्रात १७ प्राचीन कुंड बांधण्यात आले होते. सन २००२ला नाशिक महानगरपालिका प्रशासनाने नदी पात्रात (रिव्हर बेड) कॉक्रीटीकरण करून १७ प्राचीन कुंड बुजवले. त्यामुळे नदीतील जिवंत पाण्याचे स्रोत नष्ट पावले, सदैव प्रवाही असणारी स्वावलंबी गोदावरी नदी गंगापूर धरणाच्या पाण्यावर परावलंबी होऊन गेली.
यासंदर्भातील सरकारी पुराव्यांच्या आधारे देवांग जानी यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. त्या याचिकेत मुख्य न्यायाधीशांचा निकालानुसार नाशिक स्मार्ट सिटीतिल “गोदा प्रोजेक्ट” अंतर्गत गोदावरी नदी पात्रातील प्राचीन १७ कुंडा पैकी 5 कुंडातील कॉक्रीटीकरण काढले. त्यातील २ कुंडातून साडे तीन लाख किलो सिमेंट काँक्रिट नदीतून काढले. तब्बल १९ वर्षां नंतर सुद्धा गोदावरी नदी पात्रातील काँक्रीटखाली बुजलेले जिवंत जलस्रोत पुनर्जीवित झाले. संपूर्णपणे गोदापात्र कॉक्रीटीकरणमुक्त करण्याकरिता पुढील लढा सुरू आहे.
India Darpan New Article Series Godakathche Vaibhav By Devang Jani
Godavari Historic Places Nashik Ramkund