India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

धक्कादायक! मुलाला सोडून दाम्पत्याने काढला पळ; कारण जाणून घ्याल तर थक्कच व्हाल!

India Darpan by India Darpan
February 8, 2023
in राष्ट्रीय
0
प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो


इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – मुलांसाठी पालक वाट्टेल ते करण्यास तयार असतात. पण, इस्रायलच्या विमानतळावरून विरोधाभासी ठरणारी घटना समोर आली आहे. मुलाचे वेगळे तिकीट खरेदी करण्यावरून अधिकाऱ्यांसोबत वाद झाल्यानंतर एका जोडप्याने आपल्या बाळाला इस्रायल विमानतळावरील चेक-इन काउंटरवर सोडून पळ काढल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, ही घटना रायनियर एअर डेस्कच्या तेल अवीव बेन-गुरियन विमानतळावर ३१ जानेवारीला घडली. लहान मुलासह एक कुटुंब बेल्जियन पासपोर्टवर ब्रसेल्सला जात होते. पालकांनी मुलाचे तिकीट काढले नव्हते. ऐनवेळी त्यांना मुलाच्या तिकिटासाठी अतिरिक्त पैसे द्यावे लागणार असल्याचे सांगण्यात आले होते. त्यानंतर ते परिसरातच तात्ळत होते. विमानतळ कर्मचार्‍यांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी आपल्या मुलाला डेस्कजवळ बेबी स्ट्रॉलरमध्ये सोडले आणि पासपोर्ट नियंत्रणासाठी पुढे गेले.

संपूर्ण यंत्रणा वेठीस
एअरलाइन्स कंपनीच्या दाव्यानुसार तेल अवीव ते ब्रुसेल्स प्रवास करणाऱ्या या प्रवाशांनी आपल्या मुलाचे बुकिंग न करता चेक-इन केले. कपलने मुलाला चेक-इनवर सोडले आणि पुढे गेले. चेक-बेन गुरियन विमानतळावर, एजंटने विमानतळ सुरक्षेशी संपर्क साधला, ज्यांनी या प्रवाशांना परत बोलावले आणि स्थानिक पोलिसांना पाचारण केले. याच दरम्यान, इस्रायल विमानतळाच्या सुरक्षा कर्मचार्‍यांनी आउटलेटला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बेल्जियन पासपोर्ट असलेले जोडपे एका मुलासह टर्मिनल १ वर त्यांच्या मुलाच्या तिकिटाशिवाय फ्लाइटसाठी आले होते. जोडप्याला फ्लाइटसाठी उशीर झाला होता. या संपूर्ण प्रकरणात अवघी यंत्रणा वेठीस धरली गेली होती.

मुलगा मिळाला पालकांना
जोडप्याने बाळाची ट्रॉली बाळासह तेथेच सोडली आणि फ्लाइटसाठी बोर्डिंग गेटवर जाण्याच्या प्रयत्नात टर्मिनल १ च्या दिशेने धाव घेतली. या घटनेमुळे संपूर्ण यंत्रणा वेठीस धरली गेली होती. पण, पोलिस घटनास्थळी पोहोचेपर्यंत प्रकरण निवळल्याचे पोलिसांनी सांगितले. ते म्हणाले की, मूल आई-वडिलांकडे आहे. त्यामुळे आता पुढील तपास होणार नाही.

Shocking Couple Left Son on Airport for this reason


Previous Post

कोराडी महालक्ष्मी मंदिर परिसर विकासासाठी तब्बल २१४ कोटींच्या निधीस मान्यता

Next Post

इंडिया दर्पण – विचार धन – वाचा आणि नक्की विचार करा

Next Post

इंडिया दर्पण - विचार धन - वाचा आणि नक्की विचार करा

ताज्या बातम्या

या व्यक्तींवर आज लक्ष्मी प्रसन्न राहील; जाणून घ्या, रविवार, २ एप्रिल २०२३चे राशिभविष्य

April 1, 2023

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – रविवार – २ एप्रिल २०२३

April 1, 2023

इंडिया दर्पण – हास्य षटकार – पतीचा मोबाईल

April 1, 2023

नाशिकचे रामकुंड आणि गोपिकाबाई यांचा काय संबंध आहे…. असा आहे इतिहास…..

April 1, 2023

हा एक निर्णय घ्या… कांद्याचा प्रश्नच मिटून जाईल… कांदा उत्पादक संघटनेने दिला हा मोठा पर्याय

April 1, 2023

कोरोना अपडेट : देशात गेल्या २४ तासात इतक्या नव्या कोरोना रुग्णांची नोंद

April 1, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group