बुधवार, सप्टेंबर 10, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

ओव्हरटेक करण्याच्या नादात भरधाव वेगातील शिवशाही बसची स्कुलबसला धडक; ४ विद्यार्थी जखमी

by Gautam Sancheti
एप्रिल 5, 2023 | 8:53 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
accident 2

 

शिर्डी (इंडिया दर्पण वृत्तसेवा) –  राज्यात रस्ते अपघातांची संख्या व त्यामुळे होणाऱ्या मृत्यूची संख्या ही अत्यंत गंभीर बाब आहे. राज्यात दिवसेंदिवस रस्ते अपघाताचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून येते. सध्या राज्यात अपघातांची मालिका सुरूच आहे. काही दिवसांपूर्वी सांगली , नाशिक, नागपूरमध्ये शिवशाही बसला अचानक आग लागल्याची घटना घडल्या आहेत. तर दोन दिवसांपूर्वी पुण्यातील माळशेज घाटात पिकअप आणि कारचा अपघात झाला होता. त्यानंतर आता शिवशाही बस व स्कुलबसचा अपघात झाल्याची घटना घडली. लोणी बाभळेश्वर रोडवर झालेल्या या अपघातात ४ विद्यार्थी किरकोळ जखमी झाले आहेत.

ठिकठिकाणी खड्डे, रोडचे रुंदीकरण, पुलांचे बांधकाम यामुळे सर्वसामान्यांना जा- ये करण्यास मोठी अडचण निर्माण होते. त्याचप्रमाणे रोडचे काम सुरू असताना वनवे ट्राफीक असते, अशाच ठिकाणी अपघाताचे प्रमाण जास्त दिसून येते. रस्त्यावरील वाढते अपघात आणि त्यात होणारे मृत्यू ही चिंताजनक बाब आहे. नगर जिल्ह्यातील लोणी गावात शिवशाही बस आणि स्कुलबसचा अपघात झाल्याची घटना घडली. शिवशाहीने स्कुलबसला जोरदार धडक दिल्याने मोठा अपघात झाला आहे . या अपघातात स्कुल बस मधील विद्यार्थी जखमी झाले आहेत. जखमी विद्यार्थ्यांना उपचारासाठी प्रवरा रुग्णालयात दाखल केले आहे. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र ओव्हरटेक करण्याच्या नादात शिवशाही बस चालक खंदारे यांच्याकडून अपघात झाल्याची आरोप पालक वर्ग करत आहे. या अपघातानंतर लोणीचे पोलीस या अपघाताचा तपास करत आहेत.

नागपूरमध्ये धावत्या शिवसाही बसला भीषण आग लागली होती. या आगीत बस जळून खाक झाली होती. या बसमधून १६ प्रवासी प्रवास करत होते. चालकाच्या प्रसंगावधानामुळे सर्व प्रवासी सुरक्षित बाहेर आले आणि ते वाचले. सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही. पण या आगीत काही प्रवाशांचे सामान जळाल्याची माहिती समोर आली आहे. काही महिन्यांपूर्वी नाशिक जवळ जळाल्याची दुर्घटना घडली होती, तर मागील वर्षी सप्टेंबरमध्ये हडपसर – सासवड जवळएका कंटेनर आणि शिवशाही बस यांमध्ये जोरदार धडक होऊन या अपघातात एकजण जागीच ठार तर सात जण गंभीर जखमी झाले होते.

विशेष म्हणजे राज्यातील रस्ते अपघातांना आळा घालण्यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न होत असतानाही त्यात यश मिळालेले नाही. गेल्या दोन वर्षांत राज्यात सुमारे ६० हजार रस्ते अपघात झाले असून त्यात सुमारे २७ हजार प्रवासी व नागरिकांचा मृत्यू झाला. सन २०२१ च्या तुलनेत २०२२ मध्ये वाढ झाली होती, तर २०२३ मध्ये गेल्या तीन महिन्यात राज्यातील विविध भागात मोठ्या प्रमाणावर अपघात झाले विशेषतः समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातांची संख्या लक्षणीय आहे. देशभरात अपघातांच्या घटनांमध्ये महाराष्ट्र तिसरा क्रमांकावर आहे. म्हणूनच अपघाताच्या घटनांना आळा घालण्यासाठी राज्य सरकारने पुढील महिन्यात मे मध्ये रस्ता सुरक्षा मोहीम आयोजित केली आहे.

https://twitter.com/Satish_Daud/status/1643247622583623680?s=20

Shivshahi Bus Accident School Bus 4 Students injured

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

म्हसरुळ भागात शॉर्टसर्किटमुळे आग…. उडाला एकच गोंधळ… चार घरांचे नुकसान (व्हिडिओ)

Next Post

जुन्या नाशकात ३०० भक्तांनी एकत्रितरित्या पठण केले हनुमान चालीसा (व्हिडिओ)

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

cbi
संमिश्र वार्ता

सीबीआयने १८३ कोटींच्या बनावट बँक हमी घोटाळ्याप्रकरणी या कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकाला केली अटक

सप्टेंबर 10, 2025
T202509096027
महत्त्वाच्या बातम्या

पंतप्रधानांनी पंजाबमधील पूरग्रस्त भागांची केली हवाई पाहणी…इतक्या कोटींची आर्थिक मदत जाहीर

सप्टेंबर 10, 2025
C.P. Radhakrishnan Honble Governor of Maharashtra 1 1024x1024 1
संमिश्र वार्ता

महाराष्ट्राचे राज्यपाल राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदावर….मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्या अशा शुभेच्छा

सप्टेंबर 10, 2025
Untitled 4
महत्त्वाच्या बातम्या

नेपाळची सत्ता लष्कराच्या हातात…पंतप्रधान नरेंद्र मोदी घेतली मंत्रिमंडळ समितीची बैठक

सप्टेंबर 10, 2025
IMG 20250909 WA0433 1
स्थानिक बातम्या

कसमादे गौरव पुरस्कार जाहीर…शनिवारी यांचा होणार गौरव

सप्टेंबर 10, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींनी कामे अर्धवट सोडू नये, जाणून घ्या, बुधवार, १० सप्टेंबरचे राशिभविष्य

सप्टेंबर 9, 2025
Gyj9FwXXMAAG8KV
महत्त्वाच्या बातम्या

उपराष्ट्रपतीपदासाठी निवडणुकीत एनडीएचे सीपी राधाकृष्णन विजयी…पडली इतकी मते

सप्टेंबर 9, 2025
‘नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरित 2 1024x757 1
संमिश्र वार्ता

राज्यातील ९१ लाख ६५ हजार १५६ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात इतके कोटी रुपये जमा

सप्टेंबर 9, 2025
Next Post
20230405 202355

जुन्या नाशकात ३०० भक्तांनी एकत्रितरित्या पठण केले हनुमान चालीसा (व्हिडिओ)

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011