नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– जुने नाशिक भागातील बुधवार पेठ येथे सामूहिक हनुमान चालीसा पठण करण्यात आले. बुधवार पेठ मधील छपरीची तालीम संघातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. जवळपास ३०० भक्तांनी एकत्रितरित्या हनुमान चालीसा पठण केले. हनुमान जयंतीच्या पूर्वसंध्येला आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात युवक, महिला आणि लहान मुले देखील सहभागी झाले होते. ‘हरे राम, हरे कृष्णा’च्या जयघोषात भक्त तल्लीन झाले होते.
Old Nashik Hanuman Chalisa Pathan