India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

संपर्क प्रमुख भाऊ चौधरी शिंदे गटात गेल्यानंतर खासदार संजय राऊत यांनी दिली ही प्रतिक्रीया

India Darpan by India Darpan
December 22, 2022
in संमिश्र वार्ता
0

 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिवसेनेचे संपर्क प्रमुख भाऊ चौधरी यांनी मध्यरात्री शिंदे गटात प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत चौधरींनी नवी सुरूवात केली आहे. चौधरी हे शिवसेना खासदार संजय राऊत यांचा उजवा हात असल्याचे म्हटले जाते. चौधरींपूर्वी नाशकातील ११ माजी नगरसेवकांनी ठाकरे गटाची साथ सोडून शिंदे गटात सहभागी झाले आहेत. चौधरी शिंदे गटात का गेले, त्यांच्या जाण्याचे काय परिणाम होतील, यासंदर्भात खासदार राऊत यांना विचारले असता त्यांनी नेहमीप्रमाणे आक्रमक प्रतिक्रीया दिली आहे.

चौधरी यांची शिवसेनेतून हकालपट्टी केल्याचे ट्वीट खासदार राऊत यांनी काल रात्री केले होते. आता खासदार संजय राऊत यांनी चौधरी यांचे नाव घेण्याचे टाळले. पुढे ते म्हणाले की, हकालपट्टी होईपर्यंत ते कुणाला माहित तरी होते का? जेव्हा पक्षातून हकालपट्टी झाली तेव्हा लोकांना ती व्यक्ती कळली. पक्षाने पदे दिली, त्यामुळे ते मोठे झाले. आम्हीच त्यांना पदं दिली. तेच काय सर्वच जणं पक्षात असले की जवळचे असतात. शिंदेही माझ्याजवळचे होते, दादा भुसे, उदय सामंत हेही माझ्याजवळचे होते, असेही राऊतांनी स्पष्ट केले.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे #नाशिक जिल्ह्याचे संपर्कप्रमुख आणि खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय भाऊसाहेब चौधरी तसेच नाशिक ग्रामीण जिल्हाप्रमुख सुनील पाटील यांनी #बाळासाहेबांची_शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. pic.twitter.com/mgDkyuSIc3

— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) December 21, 2022

पुढे राऊत म्हणाले की, मी पक्षाचा नेता आहे, त्यामुळे पक्षात असलेला प्रत्येक व्यक्ती माझ्याजवळचा असतो. असे लोक पक्षात येतात आणि जातात. पळपुटे लोक आहेत हे. त्यांचे काही व्यक्तिगत कारणं होती, काहींची मजबूरी असते. ते काही लोकनेते नव्हते. पक्षाने पदे दिली म्हणून मोठे होते. हकालपट्टी करेपर्यंत कुणाला नावही माहिती नव्हते. मंत्री निघून गेले, संपर्कप्रमुख निघून गेलेत हे काय घेऊन बसलात, असा उलट प्रश्नच राऊतांनी पत्रकारांना विचारला.

शिवसेना नाशिक जिल्हा संपर्क प्रमुख भाऊ चौधरी यांची शिवसेना तसेच संपर्क प्रमुख पदावरून हकालपट्टी करण्यात येत आहे.शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात येत आहे@OfficeofUT

— Sanjay Raut (@rautsanjay61) December 21, 2022

Shivsena MP Sanjay Raut on Bhau Chaudhari Exit


Previous Post

मध्यरात्री २ वाजता भाऊ चौधरींचा शिंदे गटात प्रवेश; उद्धव ठाकरेंवर केला हल्लाबोल

Next Post

आमदार निवासातील टॉयलेटमध्ये धुतल्या जाताय कपबशा; अजित पवारांनी सरकारला धरले धारेवर (व्हिडिओ)

Next Post

आमदार निवासातील टॉयलेटमध्ये धुतल्या जाताय कपबशा; अजित पवारांनी सरकारला धरले धारेवर (व्हिडिओ)

ताज्या बातम्या

या व्यक्तींवर आज लक्ष्मी प्रसन्न राहील; जाणून घ्या, रविवार, २ एप्रिल २०२३चे राशिभविष्य

April 1, 2023

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – रविवार – २ एप्रिल २०२३

April 1, 2023

इंडिया दर्पण – हास्य षटकार – पतीचा मोबाईल

April 1, 2023

नाशिकचे रामकुंड आणि गोपिकाबाई यांचा काय संबंध आहे…. असा आहे इतिहास…..

April 1, 2023

हा एक निर्णय घ्या… कांद्याचा प्रश्नच मिटून जाईल… कांदा उत्पादक संघटनेने दिला हा मोठा पर्याय

April 1, 2023

कोरोना अपडेट : देशात गेल्या २४ तासात इतक्या नव्या कोरोना रुग्णांची नोंद

April 1, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group