India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

मध्यरात्री २ वाजता भाऊ चौधरींचा शिंदे गटात प्रवेश; उद्धव ठाकरेंवर केला हल्लाबोल

India Darpan by India Darpan
December 22, 2022
in संमिश्र वार्ता
0

 

नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ठाकरे गटाचे नाशिक जिल्हा संपर्क प्रमुख आणि खासदार संजय राऊत यांचे राईट हँड अशी ओळख असलेल्या भाऊ चौधरी यांनी मध्यरात्री २ वाजता शिंदे गटात प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा झाला. चौधरींची हकालपट्टी करण्यात आल्याचे ट्विट संजय राऊत यांनी काल रात्री केले होते. त्यानंतर चौधरी हे मध्यरात्री शिंदे गटात सहभागी झाले आहेत. त्यांच्या जाण्यामुळे ठाकरे गटाचे मोठे नुकसान झाल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे, नाशकातील ११ माजी नगरसेवकांनी काही दिवसांपूर्वीच शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यानंतर आता संपर्क प्रमुखही गेले आहे. चौधरींनीच या सर्व माजी नगरसेवकांचा शिंदे गटात प्रवेश केल्याचे बोलले जात आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे #नाशिक जिल्ह्याचे संपर्कप्रमुख आणि खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय भाऊसाहेब चौधरी तसेच नाशिक ग्रामीण जिल्हाप्रमुख सुनील पाटील यांनी #बाळासाहेबांची_शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. pic.twitter.com/mgDkyuSIc3

— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) December 21, 2022

शिंदे गटात प्रवेश करताच चौधरी यांनी पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. चौधरी म्हणाले की, मी गेली ३२ वर्षे शिवसेनेत काम करत आहे. गटप्रमुख, शाखा प्रमुख, विभाग प्रमुख, डोंबिवली शहर प्रमुख म्हणून मी जबाबदारी सांभाळली. पक्षाने जी जबाबदारी दिली ती मी प्रामाणिकपणे सांभाळण्याचा प्रयत्न केला. महाविकास आघाडी सरकारच्या काळात नाशिककरांच्या अनेक व्यथा घेऊन मी गेलो. तत्कालीन मुख्यमंत्र्यांना निवेदनेही दिली. मात्र, त्यातील एकही काम मार्गी लागले नाही. मुख्यमंत्री झाल्यापासून एकनाथ शिंदे यांनी नाशिकमध्ये आढावा बैठक घेतली. विकासावर त्यांचा भर आहे. त्यामुळे मला जाणीव झाली की त्यांच्या नेतृत्वात मी अधिक चांगली जबाबदारी पार पाडू शकतो. यापुढील काळात मी माझ्या कामातून उत्तर देईन, असे त्यांनी स्पष्ट केले.

नाशिक जिल्हा सपंर्क प्रमुख श्री .भाऊसाहेब चौधरी , नाशिक जिल्हा प्रमुख (ग्रामीण ) श्री . सुनील पाटील यांचा बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश ..@mieknathshinde @DrSEShinde @rautsanjay61 pic.twitter.com/ZPfgTOmKV8

— Naresh Mhaske (@nareshmhaske) December 22, 2022

Politics Shivsena Bhau Chaudhari Shinde Group Join


Previous Post

होमेथॉन प्रदर्शनात घर बुक करा आणि मिळवा चांदीचे नाणे; आजपासून रविवारपर्यंत नामी संधी

Next Post

संपर्क प्रमुख भाऊ चौधरी शिंदे गटात गेल्यानंतर खासदार संजय राऊत यांनी दिली ही प्रतिक्रीया

Next Post

संपर्क प्रमुख भाऊ चौधरी शिंदे गटात गेल्यानंतर खासदार संजय राऊत यांनी दिली ही प्रतिक्रीया

ताज्या बातम्या

मोदी सरकारचा मास्टरस्ट्रोक; केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी केली ही मोठी घोषणा

March 24, 2023
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी आज खर्चाची तयारी ठेवावी; जाणून घ्या, शनिवार, २५ मार्च २०२३चे राशिभविष्य

March 24, 2023

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – शनिवार – २५ मार्च २०२३

March 24, 2023

इंडिया दर्पण – हास्य षटकार – १ कोटीची लॉटरी

March 24, 2023

आदिवासी तरुणांना संधी का मिळत नाही? सरकारी योजना त्यांच्यापर्यंत पोहचतात का? खरं आणि जळजळीत वास्तव हे आहे…

March 24, 2023

कोल्हापूरमध्ये येणार हा मोठा प्रकल्प… ८ हजार कोटींची गुंतवणूक… ५ हजार जणांना रोजगार

March 24, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group