पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येथे रंगलेल्या ६५व्या महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेत पुण्याचा पैलवान शिवराज राक्षे याने महाराष्ट्र केसरी हा किताब पटकावला आहे. त्याने सोलापूरचा पैलवान महेंद्र गायकवाडला अस्मान दाखविले. आज झालेल्या थरारक अंतिम सामन्याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. पैलवान शिवराजला मानाची केसरी गदा प्रदान करण्यात आली. विजेत्या शिवराजला रोख ५ लाख रुपये, आणि महिंद्राची थार ही गाडी बक्षिस मिळणार आहे. तर उपविजेत्या महेंद्र गायकवाडला अडीच लाख रुपये आणि ट्रॅक्टर बक्षिस मिळणार आहे.
https://twitter.com/ddsahyadrinews/status/1614279653811974144?s=20&t=auoW22_2RUPslzCFUa6IQg
पैलवान शिवराज आणि पैलवान महेंद्र हे दोन्ही पुण्याच्या तालमीत तयार झाले आहेत. कात्रज येथील आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल तालमीत वस्ताद काका पवार आणि गोविंद पवार यांच्याकडून त्यांनी धडे घेतले आहेत. अंतिम सामन्यात पैलवान शिवराजने महेंद्रला चीतपट केले. माती विभागातील अंतिम लढतीत सोलापूरचा सिकंदर शेख आणि पुण्याचा महेंद्र गायकवाड यांच्यात चुरशीची लढत झाली. अखेर ६-४ अशा फरकाने महेंद्रने सिकंदरला हरवले. त्यामुळे महेंद्र अंतिम फेरीत पोहचला. मॅट विभागातील अंतिम लढत पुण्याच्या राजगुरुनगरमधील शिवराज राक्षे आणि नाशिकचा हर्षवर्धन सदगीर यांच्यात झाली. शिवराजने ८-१ अशा मोठ्या फरकाने सामना जिंकला. आणि अंतिम फेरी गाठली.
https://twitter.com/Dev_Fadnavis/status/1614253241700847616?s=20&t=auoW22_2RUPslzCFUa6IQg
Shivraj Rakshe Maharashtra Kesari Wrestling Tournament