India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

पुण्याचा शिवराज राक्षे ठरला ‘महाराष्ट्र केसरी’! सोलापूरच्या महेंद्र गायकवाडला केले चीतपट, एकाच तालमीतील पैलवानांमध्ये रंगली स्पर्धा

India Darpan by India Darpan
January 14, 2023
in महत्त्वाच्या बातम्या
0

 

पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येथे रंगलेल्या ६५व्या महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेत पुण्याचा पैलवान शिवराज राक्षे याने महाराष्ट्र केसरी हा किताब पटकावला आहे. त्याने सोलापूरचा पैलवान महेंद्र गायकवाडला अस्मान दाखविले. आज झालेल्या थरारक अंतिम सामन्याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. पैलवान शिवराजला मानाची केसरी गदा प्रदान करण्यात आली. विजेत्या शिवराजला रोख ५ लाख रुपये, आणि महिंद्राची थार ही गाडी बक्षिस मिळणार आहे. तर उपविजेत्या महेंद्र गायकवाडला अडीच लाख रुपये आणि ट्रॅक्टर बक्षिस मिळणार आहे.

शिवराज राक्षे ठरला ‘महाराष्ट्र केसरी’चा मानकरी; महेंद्र गायकवाडला चितपट करत पटकावली मानाची चांदीची गदा.

उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांच्या हस्ते शिवराजला मानाची गदा प्रदान.
#महाराष्ट्रकेसरी #MaharashtraKesari2023 @DDNewsHindi @DDNewslive pic.twitter.com/iwmeSQ8fXM

— DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या (@ddsahyadrinews) January 14, 2023

पैलवान शिवराज आणि पैलवान महेंद्र हे दोन्ही पुण्याच्या तालमीत तयार झाले आहेत. कात्रज येथील आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल तालमीत वस्ताद काका पवार आणि गोविंद पवार यांच्याकडून त्यांनी धडे घेतले आहेत. अंतिम सामन्यात पैलवान शिवराजने महेंद्रला चीतपट केले. माती विभागातील अंतिम लढतीत सोलापूरचा सिकंदर शेख आणि पुण्याचा महेंद्र गायकवाड यांच्यात चुरशीची लढत झाली. अखेर ६-४ अशा फरकाने महेंद्रने सिकंदरला हरवले. त्यामुळे महेंद्र अंतिम फेरीत पोहचला. मॅट विभागातील अंतिम लढत पुण्याच्या राजगुरुनगरमधील शिवराज राक्षे आणि नाशिकचा हर्षवर्धन सदगीर यांच्यात झाली.  शिवराजने ८-१ अशा मोठ्या फरकाने सामना जिंकला. आणि अंतिम फेरी गाठली.

LIVE | ६५ वी वरिष्ठ गट गादी / माती राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा व महाराष्ट्र केसरी किताब लढत २०२२-२३ बक्षिस वितरण सोहळा, पुणे https://t.co/Qld4vPMOet

— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) January 14, 2023

Shivraj Rakshe Maharashtra Kesari Wrestling Tournament


Previous Post

रेणुका महिला औद्योगिक सहकारी संस्थेच्या शिलाई मशीन प्रशिक्षण व उद्योग निर्मिती केंद्राचे उद्घाटन

Next Post

येवल्यात केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भरती पवार यांनी घेतला पतंगोत्सवाचा आनंद

Next Post

येवल्यात केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भरती पवार यांनी घेतला पतंगोत्सवाचा आनंद

ताज्या बातम्या

महाराष्ट्र तीन पुरस्कारांनी सन्मानित; सर्वोत्कृष्ट चित्ररथाचा द्वितीय, लोकपसंतीत तृतीय तर सांस्कृतिक स्पर्धेत द्वितीय पुरस्कार प्रदान

February 1, 2023
प्रातिनिधीक फोटो

धक्कादायक! सर्वसामान्यांनो, इकडे लक्ष द्या, कर्ज घेताच तब्बल ७ लाख कंपन्यांनी गुंडाळला गाशा

February 1, 2023

इंडिया दर्पण – विचार धन – वाचा आणि नक्की विचार करा

February 1, 2023

खळबळजक! शेतकरी महिलेच्या शरीराचे तुकडे करुन खून; मालेगाव तालुका हादरला

January 31, 2023
प्रातिनिधीक फोटो

विविध स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना आता भरावे लागणार एवढे परीक्षा शुल्क; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

January 31, 2023

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भगर उत्पादक महेंद्र छोरिया यांना पुरस्कार

January 31, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group