येवला (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ भरती पवार यांनी आज सायंकाळी येवला येथे पतंगोत्सवाचा आनंद घेत सर्वाना मकरसंक्रांतच्या शुभेच्छा दिल्या. शहरात तीन दिवस मोठ्या प्रमाणावर पतंगोत्सव साजरा केला जातो. या उत्सवात डॅा.पवार यांनी सुध्दा सहभाग घेतला. यावेळी त्यांना नायलॉन मांजाचा वापर कोणी करू नये असे आवाहनही केले. तर भाजपचा पतंग आणखी जोरात उंच जाणार असल्याचे त्यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले. पण, यावेळी डॅा. पवार यांनी उडवलेले दोन पंतग मात्र यावेळेस कटले..