नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – रेणुका महिला औद्योगिक सहकारी संस्था मर्यादित नाशिक (एन. एस. सॉफ्ट टॉईज अँड गारमेंट क्लस्टर) आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटन सकाळी बारा वाजता ब्रिज नगर येथे शिलाई मशीन प्रशिक्षण व उद्योग निर्मिती केंद्र यांचे उद्घाटन भाजपा महानगराचे शहराध्यक्ष अॅड. गिरीश पालवे व नाशिकच्या आमदार प्रा. देवयानीताई फरांदे यांच्या शुभहस्ते पार पडले. या कार्यक्रम प्रसंगी मा.नगरसेवक शरद मोरे ,मा. नगरसेविका संगीता ताई गायकवाड ,मा. नगरसेविका स्वातीताई भामरे ,नाशिक रोड मंडलाचे उपाध्यक्ष अशोक सातभाई ,शिवजयंतीचे कार्याध्यक्ष शांताराम घंटे नाशिक रोड मंडलाच उपाध्यक्ष गणेश सातभाई , नासिक शहराचे उपाध्यक्ष राजेश आढाव , राजू बोराडे, थॉमस सर,सिडको मंडलाध्यक्ष अर्चनाताई दिंडोरकर ,नाशिक रोड मंडळाच्या अध्यक्ष राजनंदिनी अहिरे, सामाजिक कार्यकर्ते योगेश निसाळ , सामाजिक कार्यकर्ते निलेश पेखळे ,नासिकरोड मंडळाच्या सरचिटणीस यशोदाताई पर्वतकर, या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रेणुका महिला उद्योग सहकारी संस्था मर्यादित नाशिक अध्यक्ष मंदाताई फड यांनी केले. संस्थेविषयी सर्व माहिती प्रशिक्षण व उद्योग निर्मिती यावर महिलांना सविस्तर माहिती सांगितली. केंद्र सरकारच्या योजनांचा जास्तीत जास्त लाभ महिलांना होत आहे यावेळी सर्व महिलांकडून धन्यवाद मोदीचे कार्ड हे महिलांनी भरून दिले. नंतर अशोक सतभाई यांनी महिलांना मार्गदर्शन केले व कामाविषयी माहिती सांगितली. नगरसेवक शरद मोरे यांनी महिलांना मार्गदर्शन केलं. कार्यक्रमाचे अध्यक्ष गिरीश पालवे यांनी केंद्र सरकारच्या योजना सर्व शहरभर पसरवा आणि सर्व महिलांना त्याचा फायदा व्हावा यावर मार्गदर्शन केलं, आणि जास्तीत जास्त योजना महिलांपर्यंत पोहोचावं यासाठी मंदाताई फड त्यांनी शहरभर काम करावं असं आश्वासित केलं. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणे नासिक मध्यच्या आमदार देवयानी फरांदे यांनी महिला सर्व सेक्टरमध्ये काम करतात महिला शक्ती खूप मोठी आहे, त्यांनी काम केलं पाहिजे आणि महिलांनी काम केलं तर देशाचा विकास होईल यावर महिलांसाठी चांगलं मार्गदर्शन घडून आणलं आणि शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील भाऊ पवार यांनी केले. यावेळी उपस्थित महिला आशा कदम ,चैताली सानप, स्वाती पवार ,थॉमस सर, दर्शना विसपुते , चित्रा लोखंडे, शिल्पा भगरे ,वैशाली जाधव ,अश्विनी गायकवाड, पूजा भोई ,दिपाली नीपुंगळे ,दिपाली पालवे ,माधुरी कुलकर्णी, राजश्री पिंगळे ,पूजा गोटीशे, रोहिणी पगारे , सिंधू मोरे सुगंधा पाटील वैशाली जाधव ,लिलाबाई शंकर नाडेकर, वैशाली जाधव, सुरेखा सोनार, नीता साळवी ,रीना चव्हाण ,धनश्री पाटील, कोमल मोरे, अशा कोहकडे,आधी महिला उपस्थित होत्या. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सुनील भाऊ पवार, किरण सांगळे ,प्रकाश फड, शंकर सानप ,पुष्पा कोल्हे, संध्या अहिरे ,सचिन संधान, किरण अहिरे, मंदाताई फड यांनी पार पाडला. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन स्वाती पवार यांनी केले यावेळी प्रभागातल्या जास्तीत जास्त महिलांनी कार्यक्रमाला उपस्थिती दाखवली.