India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

शिंदे सरकारचा एकनाथ खडसेंना दणका; आता ही चौकशी होणार

India Darpan by India Darpan
July 29, 2022
in संमिश्र वार्ता
0

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट व भाजप युतीतील सरकारने राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंना मोठा धक्का दिला आहे. खडसेंची पत्नी अध्यक्ष असलेल्या जिल्हा सहकारी दूध संघातील कारभारातील अनियमिता व गेल्या काळातील भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी सरकारने समिती नियुक्त केली आहे. दुसरीकडे विद्यमान संचालक मंडळ बरखास्त करून जिल्हा दूध संघावर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे.

जिल्हा दूध संघाचे माजी मंत्री माजी सुरक्षा अधिकारी नगराज पाटील यांनी जिल्हा दूध संघाच्या कारभारातील अनियमितता तसेच या दूध संघात राबविण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांच्या भरती प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याची तक्रार सरकारकडे करण्यात आली होती. मात्र गेल्या काळातील महाविकास आघाडी सरकारकडून त्याची कुठलीही दखल घेण्यात आलेली नव्हती.

जळगाव जिल्ह्यात एकनाथ खडसे यांच्या ताब्यात एकमेव जिल्हा दूध संघ होता. मात्र शिंदे व भाजप युतीतील सरकारने या ठिकाणच्या गैरकारभाराच्या चौकशीसाठी समिती नियुक्ती केली. दुसरीकडे विद्यमान संचालक मंडळ बरखास्त करत तातडीने प्रशासक नियुक्त केले आहे. हा एकनाथ खडसे यांना हा खूप मोठा धक्का मानला जात आहे. आधीच अनेक चौकशांच्या फेऱ्यात सापडलेल्या एकनाथ खडसेंच्या अडचणींमध्ये मोठी भर पडणार असल्याचे बोलले जात आहे.

या प्रकरणावर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ही मोठी राजकीय खेळी असल्याचा आरोप केला आहे. यात दूच संघाच्या कारभारात एक रुपयाचा भ्रष्टाचार झालेला नाही. जर झाला असेल तर दोषींवर कारवाई करावी, याची मागणी मी स्वतःच करणार असल्याचेही खडसे यावेळी म्हणाले. संचालक मंडळ बरखास्त करून या ठिकाणी तातडीने प्रशासक नियुक्त करणे तसेच चौकशी समिती नियुक्त करणे यात मोठे राजकारण आहे, असे खडसे यावेळी म्हणाले.

जळगाव जिल्हा सहकारी दुध उत्पादक संघाच्या संचालक मंडळाचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने तसेच दुध संघाबाबत बर्‍याच तक्रारी असल्या कारणाने संचालक मंडळ बरखास्त करण्याचे आदेश दुग्ध विकास व्यवसाय विभागाच्या उपसचिवांनी दिले आहेत. दुध संघावर 11 जणांचे प्रशासक मंडळ नियुक्त करण्यात आले असून यात आमदारांसह त्यांच्या स्विय्य सहायकांचाही समावेश आहे. जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या संचालक मंडळाचा 5 वर्षाचा कालावधी तसेच तद्नंतर महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम मधील तरतूदीनुसार मुदतवाढ देण्यात आली आहे. नविन संचालक मंडळाची निवड करण्यासाठी घ्यावयाच्या निवडणूका दि. 30 सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

प्रशासक मंडळात मुख्य प्रशासक म्हणून आमदार मंगेश चव्हाण, आमदार चंद्रकांत पाटील, माजी आ. प्रा. चंद्रकांत सोनवणे, अजय एकनाथ भोळे (भुसावळ), अमोल चिमणराव पाटील, अरविंद देशमुख, राजेंद्र राठोड, अशोक कांडेलकर, गजानन पाटील (धरणगाव), अमोल शिंदे (पाचोरा), विकास पंडीत पाटील (भडगाव), यांचा समावेश आहे, अशी माहिती या प्रकरणातील तक्रारदार तसेच दूध संघाचे माजी सुरक्षा अधिकारी नगराज पाटील यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

यासंबंधी राज्य शासनाचे उपसचिव एन. बी. मराळे यांनी आदेश काढले आहेत. त्यामुळे एकनाथ खडसे यांच्या अडचणी व डोकेदुखी वाढवणार आहे. दरम्यान, शिंदे-फडणवीस सरकारकडून घेण्यात आलेल्या या निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे म्हणाले की, ही कारवाई म्हणजे मोठी राजकीय खेळी असल्याचा आरोप केला आहे. दूध संघाच्या कारभारात एक रुपयाचा भ्रष्टाचार झालेला नाही. तसेच, संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक नियुक्त करणे आणि चौकशी समिती नियुक्त करण्यामागे मोठे राजकारण असल्याचे खडसे यांनी म्हटले आहे.

Shinde Government NCP Leader Eknath Khadse Enquiry Jalgaon District Milk


Previous Post

महाराष्ट्र पोलीस अकॅडमीमधून तीन चंदनाचे झाड चोरीला; गुन्हा दाखल

Next Post

एफडीएची कारवाई; सव्वा दोन लाखाचा गुटखा, सुगंधी सुपारी, तंबाखू हस्तगत

Next Post

एफडीएची कारवाई; सव्वा दोन लाखाचा गुटखा, सुगंधी सुपारी, तंबाखू हस्तगत

ताज्या बातम्या

शेती महामंडळाचा राखणदार लाच घेताना जाळ्यात; यासाठी मागितले होते ३ हजार… नगर जिल्ह्यातील प्रकार…

February 3, 2023
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

हृदयद्रावक! वडिलांच्या मागे चिमुकली धावली… कारखाली येऊन मृत्यू… आई-वडिलांदेखत घडला सर्व प्रकार…

February 3, 2023

वीजेच्या अवास्तव दरवाढीची तक्रार करायची आहे? आज या मार्गदर्शनाचा नक्की लाभ घ्या

February 3, 2023

लैंगिक अत्याचार करणारे तब्बल एवढे कैदी थेट फासावर; गेल्या २० वर्षांतील सर्वाधिक संख्या

February 3, 2023

कास्टिंग काऊचवर दिग्दर्शक अनुराग कश्यप म्हणतो… ‘मी नव्या कलाकारांचा वापर करतो’

February 3, 2023

अभिनेता फरहान अख्तर आणि अभिनेत्री अमृता अरोरा लपवतायत तोंड! पण का? असं काय केलं त्यांनी? (Video)

February 3, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group