India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

एफडीएची कारवाई; सव्वा दोन लाखाचा गुटखा, सुगंधी सुपारी, तंबाखू हस्तगत

India Darpan by India Darpan
July 29, 2022
in क्राईम डायरी
0

नाशिक : अमृतधाम भागातून सव्वा दोन लाख रूपये किमतीची सुगंधी सुपारी,तंबाखू आणि गुटखा हस्तगत केला आहे. गुटख्याची वाहतूक होत असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाने कळाल्यानंतर त्यांनी ही कारवाई केली. या कारवाईत चालक जितेंद्र रघुनाथ नेरपगार (४२ रा.बिडीकामगारनगर) याला गजाआड करत पथकाने अ‍ॅपेरिक्षा जप्त केली आहे. याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अन्न व सुरक्षा अधिकारी दिनेश ज्ञानेश्वर तांबोळी यांनी तक्रार दाखल केली आहे. अमृतधाम भागात मोठ्याप्रमाणात गुटख्याचा साठा असून त्याचे अ‍ॅपेरिक्षातून वितरण केले जात असल्याची माहिती एफडीएला मिळाली होती. या माहितीच्या आधारे बिडीकामगारनगर भागात पथकाने सापळा लावला असता संशयित मुद्देमालासह जाळयात अडकला. एमएच १५ इव्ही ५७५३ या अ‍ॅपेरिक्षाच्या वाहन तपासणीत राज्यात विक्री,निर्मीती आणि साठवणुकीसाठी बंदी असलेला वेगवेगळ्ळया कंपनीची सुगंधी सुपारी, तंबाखू आणि गुटखा असा सुमारे २ लाख १३ हजार ३२१ रूपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक तोडकर करीत आहेत.


Previous Post

शिंदे सरकारचा एकनाथ खडसेंना दणका; आता ही चौकशी होणार

Next Post

सोसायटीतील अल्पवयीन मुलीचा विनयभंग; गुन्हा दाखल, संशयितास अटक

Next Post
प्रातिनिधिक फोटो

सोसायटीतील अल्पवयीन मुलीचा विनयभंग; गुन्हा दाखल, संशयितास अटक

ताज्या बातम्या

दोन मजली बिल्डींग चक्क उचलून नऊ फूट मागे सरकवली; कसं काय? पुण्यातील अनोख्या प्रयोगाची सर्वत्र चर्चा (व्हिडिओ)

March 22, 2023
प्रातिनिधिक फोटो

वृद्ध महिलेच्या पर्समधील एक लाख रुपयांवर डल्ला; द्वारकेच्या आयडीबीआय बँकेतील प्रकार

March 22, 2023
प्रातिनिधिक फोटो

नाशिकरोडला कोयत्याचा धाक दाखविणारा गजाआड

March 22, 2023

नरेंद्राचार्यजी महाराज संस्थानाच्यावतीने नाशकात स्वागत यात्रा, मिरवणूक

March 22, 2023

राजधानीत गुढीपाडवा साजरा; सिन्नर तालुक्यातील बाल वारकऱ्यांच्या अभंगातून सारेच थक्क

March 22, 2023

हज यात्रेच्या नावाखाली आर्थिक फसवणूक; चार जणांविरूध्द गुन्हा दाखल

March 22, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group