इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – जगात अनेक ठिकाणी पुन्हा कोरोना विषाणूचा फैलाव होत आहे. काही ठिकाणी पुन्हा लॉकडाउन लावल्याचे वृत्तही आले होते. त्यापार्श्वभूमीवर इतर देशांनी काळजी घेण्यास सुरुवात केली आहे. कोविडने बाधित रुग्णांची संख्या वेगाने वाढत असल्याने सौदी अरब अमिरातने आपल्या नागरिकांवर भारतासह १६ देशांमध्ये प्रवास करण्यावर बंदी घातली आहे.
गल्फ न्यूजच्या वृत्तानुसार, ज्या १६ देशांमध्ये सौदी अरबच्या नागरिकांना प्रवासावर बंदी घातली, त्यामध्ये भारताशिवाय इथियोपिया, कांगो लोकतांत्रिक गणराज्य, लिबिया, इंडोनेशिया, लेबनान, सीरिया, तुर्कस्तान, इराण, अफगाणिस्तान, यमन, सोमालिया, व्हिएतनाम, आर्मेनिया, बेलारूस आणि व्हेनेझुएला या देशांचा समावेश आहे. या १६ देशांशिवाय, सौदी अरबचे नागरिक इतर देशांचा प्रवास करू इच्छितात त्यांच्याजवळ सहा महिन्यांहून अधिक काळासाठीचे अधिकृत पारपत्र असणे आवश्यक आहे. सौदी गॅझेटनुसार, अरब देशांच्या प्रवासासाठी पारपत्राची वैधता किमान तीन महिने असणे आवश्यक आहे.
इतर आखाती देशांच्या सहकार्य परिषद (जीसीसी) देशांचा प्रवास करणाऱ्या नागरिकांकडे एक राष्ट्रीय ओळखपत्र असणे आवश्यक आहे. हे ओळखपत्र किमान तीन महिने अधिकृत असावे. प्रवासासाठी मूळ ओळखपत्र आणि कुटुंबाची नोंदणी अनिवार्य आहे. त्याशिवाय, सौदी अरबमध्ये अद्याप मंकीपॉक्सचा एकही रुग्ण आढळा नाही. सौदीचे उप आरोग्यमंत्री अब्दूल्ला असिरी म्हणाले, की देशाकडे कोणत्याही संशयित रुग्णावर लक्ष देण्याची आणि शोधण्याची क्षमता आहे. जर नवे प्रकरण समोर आले तर संसर्गाशी लढण्यासही तयार आहे.
दरम्यान, जागतिक आरोग्य संघटन (डब्ल्यूएचओ)ने ११ देशांमध्ये मंकीपॉक्सचे ८० रुग्ण आढळण्याला दुजोरा दिला आहे. मंकीपॉक्स उद्रेकाची व्याप्ती आणि त्याची कारणे अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी डब्ल्यूएचओ काम करत आहे. हा विषाणू अनेक देशांमधील जनावरांमध्ये आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर नागरिक आणि प्रवाशांना कधी कधी याचा संसर्ग होत असतो, असे डब्ल्यूएचओने एका निवेदनात म्हटले आहे.